शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रायगडात रील्सना ‘नो ढील’; जिल्ह्यात धोकादायक ठिकाणी बंदी; उल्लंघन केल्यास हाेणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 05:37 IST

पर्यटकांच्या या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तसे आदेश काढले आहेत.

अलिबाग :रायगड जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवाई पसरली आहे. शिवाय जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांतून धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळांकडे वाढू लागला आहे. त्यातच धबधब्यांच्या ठिकाणी, डोंगरदऱ्यांच्या कुशीत रील्स तयार करून आपल्या इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे.

पर्यटकांच्या या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यानुसार धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात रील्स तयार करून स्टंट करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे.

‘ती’ कोसळली ३०० फूट खोल दरीत

कुंभे येथील दरीच्या बाजूला  अन्वी ही इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवत होती. मात्र, ही तिची शेवटची रील्स ठरली. रील्स बनविण्याच्या नादात ती पाय घसरून ३०० फूट खोल दरीत कोसळली.  बचाव पथकाने तिला शोधून रुग्णालयात दाखल केले होते.

अन्वीच्या मृत्यूनंतर प्रशासनाची दखल

 माणगाव तालुक्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या रील्स स्टार अन्वी कामदार हिचा पाय घसरून दरीत पडून  मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेत वरीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

 पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेताना काहीजण हुल्लडबाजी आणि अति साहस करतात. त्यामुळे जीव गमावण्याच्या घटनाही घडत आहेत. अन्वी कामदार हिचा रील्स तयार करताना कुंभे येथे दरीत पडून मृत्यू झाला. ती पाच सहकाऱ्यांसोबत पर्यटनास आली होती.

 रील्स बनविण्याच्या नादात अन्वी हिला जीव गमवावा लागला. अनेक पर्यटक असे साहसी कृत्य करून स्वत:च्या जिवाला धोका निर्माण करीत आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळांवर रील्स बनविणे, साहसी कृत्य करण्यास बंदी असून, जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

आदेशाचे पर्यटकांनी पालन करावे, आदेशाची पायमल्ली केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड