शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
3
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
4
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
5
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
6
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
7
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
8
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
9
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
10
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
11
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
12
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
13
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
14
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
15
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
16
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
17
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
18
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
19
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
20
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कैदी साधणार नातेवाईकांशी संवाद, तळोजा कारागृहात ई किस्कॉय

By वैभव गायकर | Published: March 04, 2024 4:48 PM

कैद्यांना न्यायालयीन तारखा आणि पेरॉल सुविधेसह ग्रुप फोन सुविधा मिळणार आहे.

पनवेल: तळोजा कारागृहातील कैद्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या नातेवाईकांना ई मुलाखत देता येणार आहे.या हायटेक सुविधेचे नाव ई किस्कॉय आणि ग्रुप फोन असून सोमवार दि.4 रोजी या यंत्रणेचे उदघाटन अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता हे देखील उपस्थित होते. कैद्यांना न्यायालयीन तारखा आणि पेरॉल सुविधेसह ग्रुप फोन सुविधा मिळणार आहे.

तळोजा कारागृह हा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कारागृह आहे. 2008 साली सुरु झालेल्या या कारागृहात सध्याच्या घडीला जवळपास तीन हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये बॉम्बस्फोट, दंगल, नक्षलवादी, देश विघातक घटना आदींसह अनेक मोठ मोठ्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा समावेश आहे. या बायोमेट्रिक टच स्क्रीन मशीनमुळे कैद्यांना कुटुंबातील सदस्यांच्या सेलफोन नंबरवर सणाच्या शुभेच्छा पाठवता येणार आहेत. दुसऱ्या सुविधेच नाव ग्रुप फोन सुविधा आहे. एलन ग्रुप या तामिळनाडू स्थित कंपनीने सर्वप्रथम देशात हि सुविधा उभारली आहे. यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात 40 कॉलिंग बूथ स्थापित केले आहेत. राज्याच्या गृहविभागाने तामिळनाडूस्थित कंपनीची मोफत कैदी कॉलिंग प्रणाली सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार तळोजा कारागृहात या सुविधांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भायखळा कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधिक्षक  प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, तुरुंग अधिकारी  राहुल झुटाले आदी उपस्थित होते.

आठवड्यातून तीन वेळा करता येणार फोन -

कैद्यांना आठवड्यातील 3 वेळा फोन करता येणार आहेत.6 मिनिटांच्या या फोन दरम्यान नातेवाईक, वकील आदींना फोन करता येणार आहेत.एकुण 10 मशीन तळोजा कारागृहात बसविन्यात आल्या आहेत.या सुविधेमुळे कैद्यांच्या नातेवाईकांना कारागृहात कैद्यांना भेटण्यासाठी कारागृहाचे खेटे मारन्याची गरज नाही.

टॅग्स :panvelपनवेल