शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

परजिल्ह्यातील भाज्यांपेक्षा स्थानिक भाज्यांना पसंती

By निखिल म्हात्रे | Updated: May 3, 2024 16:36 IST

ओले काजूगराचे दर सर्वाधिक असले, तरी अन्य भाज्यांचे दर मात्र परवडणारे असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. 

अलिबाग : परजिल्ह्यातून बहुतांश भाज्या विक्रीला येत असल्या, तरी स्थानिक भाज्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही स्थानिक हंगामी भाज्यांना विशेष मागणी होत आहे. त्यामध्ये फणस कुयरी, नवलकोल, पावटा, ओले काजूगर, वेलवांगी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ओले काजूगराचे दर सर्वाधिक असले, तरी अन्य भाज्यांचे दर मात्र परवडणारे असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. 

पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी, पालक, मोहरी, चवळीची भाजी उपलब्ध असून, घेवडा, वाली, गवार, सिमला मिरची, हिरवी मिरची, कोबी, वांगी, पावटा, शेवगा शेंगा या स्थानिक शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी येत आहेत. कुयरी, वांग्याची भाजी तीळकूट घालून तयार केली जात असल्याने काळ्या तिळांनाही वाढती मागणी आहे. १० ते १५ रुपये पेला दराने तीळ विक्री सुरू आहे.

दर असेपावटा : १८० ते २००वांगी : ५० ते ६०पालेभाज्या : १० ते १५अन्य भाज्या : ७० ते ८०

स्थानिक/गावठी वांगी आकाराने मोठी व लांब असून, भाजी, भरीत करण्यासाठी वापर केला जातो. शिवाय चवीलाही ही वांगी चांगली असतात. ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. वांगी, पावटा, शेवगा शेंगा घालून संमिश्र भाजी तयार केली जात असल्याने या भाज्यांची विक्री अधिक होत आहे, लाल भोपळा, दुधी भोपळा, गवार, घेवड्यासह वाली शेंगांनाही मागणी होत आहे.

परजिल्ह्यातून उपलब्ध होणाऱ्या भाज्या बारमाही उपलब्ध असतात. स्थानिक भाज्या या हंगामी असतात. त्यामुळे त्यांना प्राधान्य देत आहोत. भाज्यांबरोबर काही फळेही खरेदी करतो. या भाज्या-फळांमधील आरोग्यवर्धक गुणांमुळे शक्यतो पैशांकडे पाहत नाही. तुलनेने अन्य भाज्यांपेक्षा दर परवडणारे आहेत.- साधना कांबळे, गृहिणी

येथील स्थानिक शेतकरी विविध भाज्यांची लागवड करीत असल्याने या दिवसांत भाज्या मुबलक स्वरूपात उपलब्ध होतात. लाल मातीतील कोबी, सिमला मिरची, टोमॅटो, गवार, घेवड्याची चव वेगळीच आहे. त्यामुळे शक्यतो स्थानिक, गावठी भाज्यांची खरेदी करतो, पावट्याचा खप अधिक असल्याने दरही थोडे चढच आहे.- कल्पना मळेकर, गृहिणी

टॅग्स :Raigadरायगड