शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे पटसंख्या वाढीसाठी होणार मदत

By निखिल म्हात्रे | Updated: April 26, 2024 11:20 IST

‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबविण्यात आला.

अलिबाग : ‘पहिले पाऊल’ हा शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबविण्यात आला. या आगळ्यावेगळ्या स्वागताने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांना शिक्षणाची गोडी वाटावी यासाठी हा प्रयत्न आहे.

शाळांमधील परीक्षा संपल्या आहेत. एक ते दोन मे रोजी अनेक शाळांमधील परीक्षांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी शाळापूर्व तयारी मेळावा अभियान सुरू करण्यात आले आहे.

खासगीकरणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ती वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील दोन हजार ९१० शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान राबविले. या अभियानानिमित्ताने पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत केले. पालकांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला....असे झाले स्वागतशाळेच्या पहिल्या दिवशी चौलमळा येथील प्राथमिक शाळेत दाखल करताना नवीन प्रवेशार्थी विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, संपूर्ण शाळेची सजावट करण्यात आली होती. पहिले पाऊल टाकताना कागदावर कुंकवात उजवे पाऊल बुडवून त्यांचे ठसे घेण्यात आले. त्यावर शाळेचे व मुलांचे नाव शाळेत दाखल केल्याची तारीख टाकून तो कागद लॅमिनेशन करून शाळेत जतन करून ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता थळकर यांनी दिली.जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढावी, जिल्हा परिषद शाळेबद्दल विद्यार्थ्यांना आकर्षण निर्माण व्हावे यासाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला.कृष्णा पिंगळा,गटशिक्षणाधिकारी, अलिबाग

टॅग्स :alibaugअलिबागSchoolशाळा