रोहा : रोहा तालुक्यातील नागरिकांना वीज बिल, अथवा विजेबाबतच्या अन्य तक्रारींसाठी शरद पवार भवनमधील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयात जावे लागते. लाइट नसणे, मीटरच्या तक्रारी अथवा गावातील विजेचे नादुरुस्त पोल याबाबत नागरिकांना क्वचित प्रसंगीच दुसऱ्या मजल्यावरील वीज मंडळाच्या कार्यालयाची पायरी चढावी लागते. मात्र वीज बिल भरण्यासाठी दर महिना दुसऱ्या मजल्यावरील वीज बिल भरणा केंद्रात जाताना नागरिकांची गैरसोय होत आहे.रोहा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात चालू असणारे वीज बिल भरणा केंद्र एका पतसंस्थेमार्फत चालविले जाते. या पतसंस्थेने दुसऱ्या मजल्यावर वीज बिल भरणा केंद्र चालविल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांना त्रास सहन करावा लागत आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या वीज बिल भरणा केंद्रात गर्दी असल्यास बसण्यास जागा देखील उपलब्ध नाही. तसेच दोन मजले चढून आल्यानंतर गर्दी असली तरी इतर महत्त्वाचे काम सोडून नागरिक ताटकळत रांगेतच उभे राहणे पसंत करतात. यामुळे अनेक वेळा महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होत आहे.
रोह्यातील वीज बिल भरणा केंद्र गैरसोयीचे
By admin | Updated: April 26, 2017 00:28 IST