शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

विठूच्या गजरात दुमदुमली नगरी

By admin | Updated: July 16, 2016 02:05 IST

अलिबाग : आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत शुक्रवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील सुमारे २१८ विठ्ठल मंदिरांत शुक्रवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. अलिबाग शहराजवळच्या वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील विविध कोळीवाड्यांतील दिंड्या दर्शनाकरिता मंदिरात आल्या होत्या. दरम्यान, मंदिरात पहाटेपासूनच विविध भजन मंडळांनी आपली भजन सेवा रुजू केली. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीने देखील भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होवू नये याकरिता चांगले नियोजन केले होते. पावसापासून संरक्षण करण्याकरिता तात्पुरत्या शेडची उभारणी करण्यात आली होती. प्रसादाची देखील व्यवस्था ठेवण्यात आली होती. वरसोलीमधील इंडियन एज्युकेशन सोयायटीच्या विद्यार्थी बालगोपाळांची दिंडी काढण्यात आली होती.च्नागोठणे : शहरात मोठ्या उत्साहासह धार्मिक वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल - रखुमाई मंदिरात पहाटे पूजा झाल्यावर धार्मिक कार्यक्र मांना सुरुवात झाली. भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार शाळेच्या विद्यार्थ्यांची विठ्ठल,रखुमाई, संत तुकाराम यांच्या वेशभूषेसह बाल वारकऱ्यांची भजनाच्या गजरात शिवाजी चौकापासून पालखीसह दिंडी काढण्यात आली. 1आगरदांडा : मुरुड तालुक्यातील जुनी पेठ परिसरात असणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे १७५ वर्षे असणारे प्राचीन मंदिर याठिकाणी आहे. जुनी पेठ भागात अठरापगड जातीचे लोक एकत्र येवून एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करतात.पहाटे काकड आरती व महापूजा झाल्यानंतर मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात येते.2वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असून सर्व भक्त विठोबा मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. त्यामुळे संपूर्ण मुरुड तालुक्यात भक्तीचे वातावरण पसरलेले असते. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. त्यामुळे प्रत्येकजण या दिवशी व्रत करीत असतात.3एकात्मिक बाल विकास सेवा योजना लक्ष्मीखार अंगणवाडी क्र. ३३ या मुलांनी आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांनी टाळ व डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाच्या नामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका आरती शेंडगे, संगीता म्हात्रे उपस्थित होते.