शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

कर्जत तालुक्यातील पूल धोकादायक

By admin | Updated: July 16, 2017 02:51 IST

कर्जत तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या पुलांची अवस्था धोकादायक असून, पुलांचे संरक्षक कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहेत.

- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या पुलांची अवस्था धोकादायक असून, पुलांचे संरक्षक कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहेत. तर काही पुलांवर अद्याप संरक्षक कठडेच नसल्याने अपघाताची दाट शक्यता आहे; परंतु याकडे लक्ष देण्यास बांधकाम विभागाला वेळ मिळत नसल्याने अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील काही पूल हे सार्वजनिक बांधकाम खाते व काही पूल हे जिल्हा परिषद बांधकाम खात्यांतर्गत येतात. या पुलांकडे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष, ना जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे, त्यामुळे पुलांची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील पोशीर नदीवरील माले पूल, सालोख, वारे-कुरुंग रस्त्यावरील पूल, दहीवली पूल, मिरचोली पूल, मोहिली पूल, तलवडे पूल, अशा अनेक पुलांवरील संरक्षक कठडे व रेलिंग गायब आहेत. तर अनेक छोट्या-मोठ्या पुलांवर अद्याप संरक्षक कठडे बसवण्यात आलेले नाहीत. पुलावरील रस्तेही खराब झाल्याने प्रवास धोकादायक बनला असून, जीवघेणा ठरू शकतो.पुलांवरील तुटलेली व गायब झालेली रेलिंग बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. अनेक वेळा रस्त्यांची डागडुजी केली जाते; परंतु पुलांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर असे पूल दुरु स्त करावेत, अशी मागणी चालक, प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे. कर्जत तालुक्यातील पुलावरील तुटलेल्या रेलिंग संदर्भात वर्षभरापूर्वी दुरु स्ती प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे; मंजुरी मिळाली की पुलाच्या रेलिंगची दुरु स्ती करण्यात येईल व अन्य नादुरु स्त पुलांचीही पाहणी करण्यात येईल. - चंद्रशेखर सहनाल, उप अभियंता, सा. बा. विभाग कर्जतकर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुलांवरील रेलिंग लवकरात लवकर बसवाव्या, जेणेकरून अपघात होऊ नये.- मच्छींद्र्र मसणे, वाहनचालकपुलावरील तुटलेले संरक्षक पाइप बसविण्यासाठी बांधकाम विभागाकडे गतवर्षी तक्र ार केली होती; परंतु बांधकाम विभागाने अद्याप या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली नाही. पुन्हा एकदा बांधकाम विभागाला कळविले जाईल. - सुदाम पेमारे, जिल्हा परिषद, सदस्य तुटलेल्या पुलांवरील आणि गायब झालेल्या संरक्षक पाइप बसविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून पुलांवरील तुटलेले पाइप बसविण्यात येत नाहीत, याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.- प्रवीण शिंगटे, प्रवासी