शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शेकापच्या पाठबळावर फिरतेय राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:02 IST

स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे.

- जयंत धुळपप्रकल्पांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या रायगडवरील वर्चस्वासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कितीही झुंजत असली, तरी येथील स्थानिक राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाचाच प्रभाव असल्याने तो पक्ष ज्याच्यासोबत त्याची स्थिती तुलनेने दिलासादायक असल्याचा प्रत्यय या निवडणुकीतही येतो आहे.चारवेळा निवडून आलेले अनंत गिते यांना प्रस्थापितांविरोधी नाराजीचा सामना करावा लागतो आहे. मागील निवडणुकीत त्यांना दिलेला पाठींबा काढून घेत निसटता पराभव पत्करावा लागलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासोबत यावेळी शेकाप आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी, त्यांच्या नेत्यांशी पूर्वी असलेले वाद मिटवले आहेत.रायगडमध्ये आलेले किंवा येऊ घातलेले प्रकल्प, त्यातील विस्थापित, रेल्वेचे रखडलेले प्रकल्प, जलवाहतूक किंवा बंदरांचे प्रश्न यापैकी एकही मुद्दा ठळकपणे प्रचारात नाही. मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा काही प्रमाणात सभा गाजवतो, पण तेवढ्यापुरताच. गीतेंनी तटकरेंच्या कथित भ्रष्टाचारावर प्रचारात भर दिला आहे, तर तटकरेंनी गीतेंच्या निष्क्रियतेवर. मंत्रीपद असूनही गीते एकही मोठा उद्योग किंवा प्रकल्प आणू न शकल्यावर आणि त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटत नसल्यावर त्यांचा भर आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जो भाग या मतदारसंघात येतो, तेथे फळबागायतदारांचा प्रश्न काहीसा चर्चेत येतो. त्यामुळे प्रचारात ठोस मुद्यांचा अभाव आहे. खासदारांची कामे, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, केंद्र सरकारची कामगिरी- तेथून जिल्ह्याला काय मिळाले, यासारखे मुद्दे गौण होत वैयक्तिक हेवेदावे, उमेदवारांची क्षमता-दर्जा याभोवती भाषणे फिरताना दिसतात.

राष्ट्रवादीतील वाद मिटवण्याबरोबरच शेकापचा पाठींबा, काँग्रेसची नाराजी दूर करण्यात वेळीच यश आल्याचा परिणाम तटकरेंच्या प्रचारावर दिसतो आहे. रायगड जिल्ह्याच्या मोजका भाग वगळता भाजप हवा तितका प्रबळ नसल्याने शिवसेनेला या मतदारसंघात एकाकी खिंड लढवावी लागते आहे. युतीतील पक्ष म्हणून भाजप, त्यांचे नेते सोबत आहेत, पण त्याचा परिणाम रत्नागिरीत तुलनेने अधिक दिसतो आहे. नवमतदारांचे प्रमाण वाढते असूनही प्रचारसभांत तरूणांची संख्या नगण्य असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र या मतदारसंघात पाहायला मिळते.
>भ्रष्टाचारी व्यक्तीला रायगड-रत्नागिरीचे मतदार खासदार म्हणून कधीही निवडून देणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. बलशाली भारत बनवायचा असेल, तर देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदींकडे असणे आवश्यक आहे.- अनंत गीते, शिवसेना>मतदारांना नेहमी फसवता येत नाही. निष्क्रीय खासदार सर्वांना अनुभवण्यास मिळाले. त्यांना रायगडचा मतदार पुन्हा स्वीकारणार नाही. माझ्या कारकिर्दीत आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून केलेली विकासकामे मतदारांसमोर आहेत. डुप्लिकेट उमेदवार कितीही उभे केले, तरी माझा विजय नक्की.- सुनील तटकरे, राष्ट्रवादी>कळीचे मुद्देमुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्णावस्थेतील काम आणि कोकण रेल्वेच्या गंभीर बनत गेलेल्या विविध समस्या.अवजड उद्योगमंत्री असतानाही गीतेंनी एकही कारखाना, मोठा उद्योग आणला नाही. बेरोजगारी कमी होण्याऐवजी प्रचंड वाढल्याची टीका.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते