शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लग्न, वाढदिवस आणि अंत्यविधीतही राजकीय पुढारी

By निखिल म्हात्रे | Updated: May 4, 2024 21:51 IST

सध्या लग्नसराई सुरू असून येथील गर्दी प्रचारासाठी आयती मिळत आहेत. तेथेही राजकीय लोकांचे जत्थेच्या जत्थे पोहोचत आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील नेतेमंडळी यानिमित्त गावात पायधूळ झाडत आहेत.

अलिबाग : रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होत असून प्रचारासाठी सातच दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांबरोबर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नेतेही प्रचारात उतरले आहेत. आपल्या भागात कोणाचा वाढदिवस असो की लग्न किंवा अंत्यविधी तेथे हे राजकीय लोक पोहोचत आहेत.स्थानिकांच्या गाठीभेटी घेत मतदारांपर्यंत पोहोचून संपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लग्नसराई सुरू असून येथील गर्दी प्रचारासाठी आयती मिळत आहेत. तेथेही राजकीय लोकांचे जत्थेच्या जत्थे पोहोचत आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील नेतेमंडळी यानिमित्त गावात पायधूळ झाडत आहेत.साहेब येताहेत, अक्षता थांबू देत!एका लग्नसोहळ्यात वरपित्याने तर कहरच केला. आपल्या नेत्यासाठी चक्क मुहूर्त टाळला. मुहूर्त दुपारी १२:३५ वाजताचा होता, पण अक्षता पडायला दीड वाजला. लग्नासाठी नेत्याला आमंत्रण दिले होते. नेता तास-दीड तास उशिरा आला. पण तोपर्यंत वरपित्याने लग्न थांबवून ठेवले. नेता आल्यावर मंगलाष्टका झाल्या.वधू-वरांच्या हातात मतदानाच्या आवाहनाचे फलक -निवडणूक आयोग यावर्षी ७५ टक्केपेक्षा जास्त मतदानासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी आता ते थेट लग्न सोहळ्यातही प्रबोधन करीत आहेत. लग्नासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, हे लक्षात घेत वधू-वरांच्या हातात मतदानाच्या आवाहनाचे फलक दिले जात आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकmarriageलग्नalibaugअलिबाग