शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक सुरक्षितेसाठी पोलीस गृहभेटीला, श्रीवर्धन पोलीस दलाचा कौतुकास्पद उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:08 IST

Police News : मानवी आयुष्यातील वार्धक्याच्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर भक्ती याची आस लागलेली असताना भावनांचा होणारा कोंडमारा सहन करत जीवन जगताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यात असंख्य अडचणी येतात.

श्रीवर्धन  - मानवी आयुष्यातील वार्धक्याच्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर भक्ती याची आस लागलेली असताना भावनांचा होणारा कोंडमारा सहन करत जीवन जगताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यात असंख्य अडचणी येतात. अशा कठीण प्रसंगी पोलीस दलाकडून होणारी आपुलकीची विचारणा ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच सुखद आहे.समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोलीस यंत्रणेने ज्येष्ठ नागरिकांच्या गृहभेटीला श्रीवर्धनमध्ये प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या विविध भागांतील ज्येष्ठ नागरिकांच्या गृहभेटीस सुरुवात केली आहे. श्रीवर्धन दामिनी पथक व स्थानिक पोलीस नियमित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे निराकारण करत आहेत.

मंगळवारी सायंकाळी पोलीस कर्मचारी कविता देवर्डेकर व परशुराम टेकाळे यांनी गणेश आळीमधील रोहिणी क्षीरसागर यांची गृहभेट घेतली. या प्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांनी रोहिणी यांच्याशी अतिशय सोज्वळ व आपुलकीने संवाद साधला. रोहिणी यांची मुलगी पुण्यात असते. सद्य:स्थितीत त्या घरात एकट्याच असतात. अशा एकांताच्या काळात पोलीस दलाने कल्पकतेने सुरू केलेल्या या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखद बाब ठरत आहे. 

समाजातील प्रत्येक घटकाला संरक्षण देण्याचे दायित्व पोलीस प्रशासनाचे आहे; परंतु त्यासोबत मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजहिताला प्राधान्य देते. श्रीवर्धनमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी काही वेगळं करता येईल का या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.- प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक श्रीवर्धन

श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे कविता देवर्डेकर व परशुराम टेकाळे यांनी माझ्याशी अतिशय आदराने व प्रेमाने संवाद साधला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. या उपक्रमाचा ज्येष्ठ नागरिकांना निश्चितच फायदा होईल. त्यांच्या अनेक समस्यांचे या उपक्रमात निर्मूलन होईल याची खात्री वाटते.-रोहिणी क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक श्रीवर्धन पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही श्रीवर्धन शहरातील विविध भागात जाऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आहोत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली जात आहे.-कविता देवर्डेकर, दामिनी पथक श्रीवर्धन 

 

टॅग्स :PoliceपोलिसSenior Citizenज्येष्ठ नागरिक