शहरं
Join us  
Trending Stories
1
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
3
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
4
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
5
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
6
INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज
7
परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
8
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!
9
SBI चा ग्राहकांना तगडा झटका, मासिक EMI वाढणार! MCLR च्या दरात 10 बेसिस प्वाइंट्सची वाढ 
10
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
11
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
12
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
13
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
14
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
15
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
16
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
17
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
18
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
19
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
20
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...

पोलिसांना मिळाली आगळी भेट; बंदोबस्तातील जवानांना दैनंदिन वस्तूंचे पॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:10 AM

संवेदनशील पोलीस अधीक्षकांचा जिव्हाळा

- जयंत धुळप अलिबाग : रायगड लोकसभा निवडणूक बंदोबस्ताकरिता रायगड जिल्हा पोलीस दलास सहकार्य करण्याकरिता आलेले तेलंगणा सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान असे एकूण २ हजार ५०० पोलीस आणि अधिकारी रविवारी दुपारी काही क्षण अगदी हळवे झाले. कोणतीही कल्पना नसताना बंदोबस्तास निघताना या सर्व पोलीस जवानांना दैनंदिन लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे पॅके ट देण्यात आले.या पॅकेटमध्ये व्यक्तिगत दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी प्रसंगी पैसे देवूनही उपलब्ध होवू शकणार नाहीत अशा दाढीचा रेझर, टुथब्रश, कोलगेट पेस्ट, दोन बिस्कीटचे, चॉकलेट, तेलाचे छोटे पाऊच, डेटॉल बाथसोप, पाण्याच्या दोन बाटल्या, उन्हाळ््याचा त्रास झाल्यास ओआरएस पावडर आदी वस्तूंचा या पॅकेटमध्ये समावेश आहे.रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिलेल्या या आगळ््या आणि अविस्मरणीय अनुभूतीअंती, बंदोबस्तात आमच्याकडून कोणतीही हयगय वा कर्तव्य कसूर होणार नाही असा सुप्त विश्वास या सर्व पोलिसांनी पारसकर यांना दिला. निवडणूक बंदोबस्ताचा ताण आणि तप्त उन्हाळा अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षकांची ही अनोखी संवेदनशीलता आणि आपल्या कर्मचाऱ्यांबाबतचा जिव्हाळा येथे सर्वांना रविवारी मोठा आनंद देवून बंदोबस्ताच्या मानसिक सज्जतेत पोषक ठराला.निवडणूक काळात कोणत्या परिसरातील, कोणत्या मतदान केंद्रावर, कोणत्या परिस्थितीत मुक्काम करुन बंदोबस्त करावा लागेल हे अखेरच्या क्षणापर्यंत या पोलिसांना गुप्ततेच्या कारणास्तव माहिती नसेत. त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी आंघोळ, दाढी आदी दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी करता येतील का त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री वा व्यवस्था तिथे मिळेल का असा प्रश्न नेहमीच या पोलीस जवानांसमोर असतो. अनेकदा खिशात पैसे असूनही दुर्गम भागातील मतदान केंद्रावरील बंदोबस्ताच्या ठिकाणी या गोष्टी उपलब्ध होत नाहीत. परिणामी या प्रतिकुलतेचा परिणाम पोलिसांच्या मानसिकतेवर होवून त्याचे पडसाद बंदोबस्ताच्या ठिकाणच्या परिस्थिती हाताळण्यावर होवू शकतो, या साºया बाबींचा विचार रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी गेल्या महिनाभरापूर्वीच करुन हे लक्षवेधी नियोजन केले होते.इतकेच नव्हे तर आपल्या पोलीस दलास सहकार्य करण्यासाठी बाहेरुन आणि परराज्यातून येणाºया पोलिसांना किमान सुखाची चार तास झोप मिळाली पाहिजे याकरिता पारसकर यांनी परिसरातील छोटी सभागृहे आणि तत्सम जागा मिळवून त्या ठिकाणी या सर्व पोलीस जवानांची निवास व्यवस्था केली आहे.आपला पोलीस हाच खरा काम करणारा माणूस असतो त्याचा विसर आपल्याला पडता कामा नये,अशा मानसिकतेतून सातत्याने कार्यरत रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांना निवडणूकीच्या निमीत्ताने आमच्याकडून केला जाणारा सॅल्यूट केवळ हातानेच केलेला नसेल तर तो मनापासूनचा असेल अशी भावना एका पोलीस जवानानेच व्यक्त केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक