शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

पोलीस - नागरिकांमध्ये सुसंवाद घडल्यास समस्या दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 4:56 AM

अनिल पारसकर : रायझिंग डेनिमित्त अलिबागमध्ये सप्ताहाचे आयोजन; पोलिसांबाबत सकारात्मक भूमिका ठेवण्याचे आवाहन

अलिबाग : कोणताही कायदा वा नियम हा पोलिसांनी तयार केलेला नसतो. कायदे हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठीच केलेले असतात. पोलीस केवळ त्याची अंमलबजावणी करतात. पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद असेल, तर प्रश्न उद्भवू शकत नाहीत आणि विविध समस्या सुटू शकतात, असा विश्वास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी शनिवारी व्यक्त केले आहेत.

पोलीस रायझिंग डे आणि सप्ताहानिमित्त अलिबाग पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित पोलीस रायझिंग डे कार्यक्रमात पारसकर बोलत होते. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते व अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ल. नि. नातू विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

पारसकर म्हणाले, आधुनिक युगात, आपल्या मुलाबद्दल आईवडिलांना नाही, त्यापेक्षा अधिक माहिती ‘गुगल’ला असते. आपले ईमेल अ‍ॅड्रेसद्वारे गुगलला जोडलेले असतात. परिणामी, मोबाइलमुळे तुमचे लोकेशन, तुम्ही कोणत्या वेबसाइट्स पाहिल्यात, कोणाला फोन केला वा मेसेज केला याची संपूर्ण माहिती गुगलवर संग्रहित होते. परिणामी, आपल्या हातून चुकीची कृती मोबाइलवरून होत नाही ना, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रदीप नाईक म्हणाले, पोलीस जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात याचे भान जनसामान्यांनी ठेवून पोलिसांसोबत सुसंवाद राखणे गरजचे आहे. हेल्मेटसक्ती पोलीस करतात यात जनतेचेच हित आहे. पोलिसांबाबत सकारात्मकता स्वीकारणे गरजेचे असल्याचे नाईक यांनी सांगितले. या वेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी महिला अत्याचार विषयक कायद्यांतील तरतुदींची माहिती दिली, तर अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ल. नि. नातू यांनी पोलीस यंत्रणेबाबतचे आपले अनुभव सांगितले.वैशिष्ट्यपूर्ण पथनाट्यच्५८ वर्षांपूर्वी २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज समारंभपूर्वक प्रदान केला होता. तेव्हापासून २ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाचा रायझिंग डे साजरा केला जातो. २ ते ७ जानेवारी या काळात रायझिंग डे सप्ताह आयोजित करून पोलीस व नागरिक नाते वृद्धिंगत केले जाते, अशी माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.श्वानांची प्रात्यक्षिकेच्रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख सुरेश वराडे व दशरथ पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रीझम सामाजिक संस्थेच्या कला पथकाने या वेळी पथनाट्य सादर केले तर रायगड पोलीस श्वान पथकाने या वेळी पोलीस तपासाचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविले.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड