शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वसईत रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:34 IST

गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती  घेतली आहे.

नालासोपारा : वसई-विरार शहरांतील गर्दी होणाऱ्या रस्त्यांच्या कडेला हजारो बेवारस आणि भंगार वाहनांमुळे नागरिकांना चालण्यास त्रास सहन करावा लागत आहे. या गाड्यांमुळे वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या वाढली आहे. यामुळे गेल्या चारपाच दिवसांपासून अशा गाड्या उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती  घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटविण्यासाठी आणि नो-पार्किंग झोनमध्ये अनधिकृतपणे वाहने पार्क केली जातात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश जाहीर केला होता. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे पार्किंग झोन नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई कशी करावी, हा प्रश्न पडला होता. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कडेला अशी वाहने बिनधास्तपणे पडलेली असूनही वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, चारपाच दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशी वाहने उचलण्यास सुरुवात केली आहे.

वसई, विरार, नालासोपारा या शहरांतील अनेक रस्त्यांच्या कडेला कित्येक महिन्यांपासून भंगार गाड्या पडलेल्या असल्याने सर्वत्र घाण पसरत होती. नागरिक या भंगार गाड्यांवर कचऱ्याच्या पिशव्या फेकत होते. साफसफाई कर्मचारी हे कचरा उचलत नसल्याने कचरा सडून दुर्गंधी पसरली असल्याने मच्छरांची पैदाससुद्धा वाढली होती.

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिस