शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आक्षी गावांतील पाटील कुटूंबाचे विष प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 18:21 IST

शरिरात विष निष्पन्न झाले,गॅस्ट्रीक अॅस्पिरेशन सॅम्पल तपासणीअंती होणार स्पष्टता

जयंत धुळप 

अलिबाग जवळच्या आक्षी गावांतील पाटील कुटूंबातील पाच सदस्यांना त्यांच्याच घरातून  बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध आणि अत्यावस्थ अवस्थेत शेजारच्यांनी अलिबाग येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले होते. त्यांतील रामचंद्र दत्तात्नेय पाटील (60) आणि पत्नी रंजना रामचंद्र पाटील(50)जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहेत. रामचंद्र दत्तात्नेय पाटील यांची प्रकृती चांगल्या पैकी सुधारली आहे, मात्र त्यांंच्या पत्नी रंजना रामचंद्र पाटील यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान सून कविता राहूल पाटील(25), नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष)या तिघांना बुधवारी मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, त्यांचीही प्रकृती सुधारत असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगीतले.

 

शरिरात विषांचा अंश प्राथमिक तपासणीत निष्पन्न 

वैद्यकीय उपचाराच्यावेळी या सर्वाच्या शरिरात विषांचा अंश असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पोटातील विष काढण्याकरिता जी गॅस्ट्रीक अस्पिरेशन वैद्यकीय प्रक्रीया अवलंबली जाते त्यावेळी रुग्णांच्या पोटातून प्राप्त अन्न व अन्य द्रव यांचे नमुने घेवून ते पोलीस तपास यंत्रणोकडे पूढील शास्त्रीय तपासण्याकरीता देण्यात आले आहेत. त्या शास्त्रीय तपासण्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर या बाबत अधिक स्पष्टता होवू शकेल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी दिली आहे.

 

आम्ही कोणत्याही प्रकारचे विष प्राषन केलेले नाही

रामचंद्र दत्तात्नेय पाटील यांची प्रकृती सुधारल्याने तसेच व्यवस्थित बोलू लागले असल्याने त्यांचा या घटनेच्या अनूशंगाने पोलीसांनी गुरुवारी सकाळी जबाब घेतला असता, पाटील यांनी आपल्या कुटूंबाने कोणत्याही प्रकारचे विष प्राषन केलेले नाही. मंगळवारी रात्री केवळ आम्ही सर्वानी कोल्ड्रींक घेतले होते,असे सांगितल्याचे या घटनेचे तपासीक अंमलदार व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी सांगीतले.  मंगळवारी संध्याकाळ पासून आक्षी गावांत विज नसल्याने रात्री घरात दिवे लागण्याकरिता व फॅन चालण्याकरिता रॉकेलवर चालणार जनरेटर लावला होता. जनरेटरच्या गॅस मुळे त्रस झाल्याचे रामचंद्र दत्तात्नेय पाटील यांनी पूढे सांगीतल्याचे पोलीस निरिक्षक पाटील यांनी सांगीतले.

फिनेल सारख्या द्रवाची एक रिकामी व एक भरलेली बाटली पोलीसांच्या ताब्यात 

दरम्यान पाटील यांच्या आक्षी येथील घरात पोलीस तपास पथकाने केलेल्या तपासणीत जनरेटर आणि त्याकरीता आठ लिटर रॉकेल वापरले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच बरोबर बुधवारी घरातून फिनेल सारख्या द्रवाच्या एक रिकामी व एक भरलेली बाटली पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.