शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भिशीतून कापला जातोय सर्वसामान्यांचा खिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:45 AM

फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ : नियमबाह्य गुंतवणुकीवर दिला जातोय भर; पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित

नवी मुंबई : शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या भिशीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोने व्यावसायिकांसह घरगुती भिशीचालकांकडून हे प्रकार घडत आहेत. मात्र, उघडपणे आरबीआयच्या नियमांची पायमल्ली करून चालणाºया या आर्थिक व्यवहारातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.

एपीएमसी येथील गुडविन ज्वेलर्सकडून सर्वसामान्यांच्या झालेल्या फसवणुकीत भिशी ग्राहकांचाही समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यापैकी अनेकांनी पाच लाखांहून अधिक रक्कम भिशीच्या स्वरूपात गुंतवलेली होती. त्यानुसार तक्रारीवरून समोर आलेल्या सात कोटींच्या रकमेत सर्वाधिक रक्कम भिसीच्या स्वरूपात जमा केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, भिशीच्या माध्यमातून ज्वेलर्सचालकांकडून फसवणूक झाल्याची शहरातील ही पहिली घटना नसून, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्या माध्यमातूनही सर्वसामान्यांच्या ठेवी जमा करून घेतल्यानंतर ज्वेलर्सचालकांनी रातोरात पोबारा केला आहे.ज्वेलर्सचालक अथवा खासगी व्यक्तींना आर्थिक ठेवी जमा करण्याच्या कायद्याने अधिकार नाही. यानंतरही केवळ जादा नफ्याचे अथवा इतर फायद्यांचे आमिष दाखवून ज्वेलर्सचालकांकडून भिशी चालवल्या जातात. तसे बोर्डही बहुतांश ज्वेलर्सच्या बाहेर लावल्याचे पाहायला मिळत आहेत. ते पाहून अनेक ग्राहक ऐपतीनुसार जमेल ती रक्कम ज्वेलर्सचालकाकडे जमा करत असतात. ही रक्कम ज्वेलर्सचालकांकडून त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापरली जाते. तर ठरावीक कालावधीसाठी काही टप्प्यात ग्राहकांना त्याचा मोबदलाही दिला जातो. मात्र, ठेवीचा आकडा वाढल्यानंतर संबंधिताकडून ठेवीचा अपहार करून पळ काढला जातो. अशा प्रकारे सोनारांनी रातोरात पळ काढल्याच्या घटना मागील काही महिन्यांत नवी मुंबईत अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तर काही खासगी व्यक्तींकडूनही परिचयाच्या गटागटांत ठरावीक रकमेची भिशी चालवली जात आहे. अशा काही व्यक्तींनीही भिसीची रक्कम लुटून पळ काढल्याची उदाहरणे आहेत. त्यामध्ये अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.भिशी, फंडवर कारवाईची गरजच्बेकायदेशीरपणे चालणाºया गुंतवणुकीत फसवणूक होत असल्याचे माहीत असतानाही अनेक जण पैसा गुंतवतात; परंतु फसवणूक झाल्यानंतर त्याचे खापर यंत्रणेवर फोडतात. त्यामुळे शहरात अवैधरीत्या चालणाºया भिशी व इतर प्रकारच्या गुंतवणुकींवर पोलिसांकडून पाळत ठेवली जाण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :RaigadरायगडMONEYपैसा