शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
2
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
3
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
4
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
5
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
7
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
8
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
9
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
10
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
11
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
12
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
13
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
14
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
15
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
16
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
18
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
19
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
20
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

पीएमसी बँक घोटाळा : राकेश, सारंग वाधवा यांची अलिबागमधील मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 1:07 AM

शनिवारी ईडीने वाधवा यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास येथील २०० खोल्यांच्या फार्महाउसवर कारवाई केली.

अलिबाग : पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) आर्थिक गैरव्यवहार प्रकणात अडकलेल्या राकेश आणि सारंग वाधवा यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास येथील फार्महाउसवर ईडीने शनिवारी छापा टाकला. छाप्यामध्ये अनेक कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यानंतर आता ईडीने सोमवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील फाल्कन-२०० जेट विमान ताब्यात घेतले आहे. ईडीने केलेल्या कारवाईतील हे दुसरे जेट विमान असल्याचे बोलले जाते.शनिवारी ईडीने वाधवा यांच्या अलिबाग तालुक्यातील आवास येथील २०० खोल्यांच्या फार्महाउसवर कारवाई केली. बंगल्याच्या आवारात गाड्या, नौका आढळून आल्या आहेत. त्यामध्ये दोन बॅटरीवर चालणारी गोल्फ कार्ट्स, तीन माउंटन बाइक्स, एक स्पीडबोट आणि एक मर्सिडिज बेंझ, बेंटली, रोल्स रॉइस या गाड्यांचा समावेश आहे.यापैकी एक कार कर्नाटकमधील आहे. दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केल्याचे समोर आले आहे. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या राकेशकुमार वाधवा आणि त्याचा मुलगा सारंग यांच्या नावावर आहेत, तर कर्नाटक पासिंगची कार ही हाउसिंग डेव्हलपरच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत वाधवाच्या सुमारे १५ गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत, तसेच मालदीवमध्ये एक यार्ट (नौका) आणि एअरक्र ाफ्टही आढळून आले होते.पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा यांना ३ आॅक्टोबर रोजीच अटक करण्यात आली आहे.पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष विरमसिंह यांच्या खात्यात ईडीला दहा कोटी रुपये सापडले आहेत, त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत शेकडो कोटीच्या संपत्तीचा उलगडा झाला आहे. ईडी लंडन आणि दुबईमधील मालमत्तांचाही शोध घेत आहे. तेथील मालमत्तांचा वाधवा यांच्याशी काही संबंध आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.विशेष बाब, म्हणजे जिल्हा प्रशासनाने सीआरझेडचे उल्लंघन केल्या प्रकरणी १५९ जणांना नोटीस बजावली होती. त्यामध्येही वाधवा यांच्या या बंगल्याचा समावेश आहे. सध्या सीआरझेड कारवाईवर वाधवा यांनी न्यायालयातून स्थगिती घेतली आहे.- पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी डायमंड किंग नीरव मोदी यानेही सीआरझेडचे उल्लंघन केले होते. त्यानंतर त्याच्या किहीम येथील बंगल्यातील किमती वस्तूंचा लिलाव करण्यात येऊन त्याच्या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. वाधवा याच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे आणि अजून त्यामध्ये भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या माध्यमातून पीएमसी बँकेतील ठेवीदारांची रक्कम देणार का याबाबात अद्याप स्पष्ट झालेले नाही. ईडी ज्याच्या मागावर आहे तो फरार असलेल्या मेहुल चोकसी याचा बंगला वाधवा याच्या बंगल्यापासून काही अंतरावरच आहे.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँक