शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकमिश्रीत रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 03:46 IST

पनवेल महापालिकेचा प्रयोग फसला : सहा महिन्यांतच रस्ता उखडला; कंत्राटदाराला दिले निर्देश

वैभव गायकर

पनवेल : महापालिकेने मोठा गाजावजा करीत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्याचा प्रयोग केला होता; परंतु महापालिकेचा हा प्रयोग सपशेल फसला आहे. कारण अवघ्या सहा महिन्यांत या रस्त्याची चाळण झाली आहे. प्रयोगिक तत्त्वावर प्लॅस्टिक मिश्रणापासून तयार करण्यात आलेला ५०० मीटरच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

पनवेल महापालिकेने सर्वप्रथम प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती. यानंतर राज्यभर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विविध विक्रेते व दुकानदारांकडून जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणात करण्यात आला होता. २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत २६ फेब्रुवारी २०१८ रोजी आगरी समाज हॉल येथे प्लॅस्टिक मिश्रणातून रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यासाठी जप्त केलेला चार टन प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमत:च अशाप्रकारे प्लॅस्टिक मिश्रीत डांबरी रस्ता तयार करण्यात आल्याचा दावादेखील पालिकेमार्फ त करण्यात आला होता. या प्रयोगामुळे रस्त्याचे आयुर्मान वाढेल, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते; परंतु अवघ्या सहा महिन्यांतच महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या ५०० मीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने सर्वप्रथम हा प्रयोग राज्यात सुरू केला होता. प्लॅस्टिक आणि डांबरचे मिश्रण तयार करून यामध्ये ९० टक्के डांबर आणि १० टक्के प्लॅस्टिक पिशव्यांचा समावेश करण्यात आला होता. पनवेल महापालिकेने आगरी समाज हॉल ते सावरकर चौक या ५०० मीटरच्या अंतरात हा रस्ता तयार केला होता. हे काम अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते; परंतु महापालिकेचा हा प्रयोग पूर्णत: फसल्याचे दिसून आले आहे.आगरी समाज हॉल ते सावरकर चौक या ५०० मीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण; यामध्ये ९० टक्के डांबर तर १० टक्के प्लॅस्टिकचे मिश्रण होते. यात सुमारे चार टन प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला होता; परंतु अवघ्या सहा महिन्यांतच हा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे महापालिकेचे २५ लाख रुपये पाण्यात गेले आहेत.संबंधित कंत्राटदाराला पत्र काढले आहे. प्लॅस्टिक मिश्रीत रस्त्याच्या कामाचा सुरक्षा कालावधी एक वर्षाचा आहे; परंतु सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्यामुळे या रस्त्याचे पुन्हा काम करण्यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला बजावण्यात आले आहे.- संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा