शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उरणची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; खासदार विनायक राऊतांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2023 15:20 IST

शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता ठाकरेंच्या पाठिशी आहे.

मधुकर ठाकूर

उरण :  शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी जाहीर कार्यक्रमातून केले. उरण तालुका व उरण शहर शिवसेनाच्या वतीने शनिवारी (२९)उरण येथे सामाजिक व शैक्षणिक, आरोग्य शिबीर आदी कार्यक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थीना वह्या आणि छत्र्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शहरातील राममंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी खासदार विनायक राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शिवसेना उरण शहर व उरण तालुक्याच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,गरजूंना मोफत वह्यांचे वाटप व जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. ही खूपच कौतुस्कापद व अभिमानाची बाब आहे. जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळातही जनतेची रात्रंदिवस जनतेची सेवा केली.

शिवसेनेच्या माध्यमातून परिसरात अनेक विकासकामे केली आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी जाहीर कार्यक्रमातून केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार विनायक राऊत यांनी उरण तालुका व उरण शहर शिवसेनेच्या कार्याचे कौतूक करतानाच विद्यार्थ्यांनी खूप चांगले शिकून मोठे व्हा असा मौलिक सल्लाही दिला.यावेळी माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर,जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरवही करण्यात आला. 

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत,तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शिवसेना गटनेते गणेश शिंदे,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, उपतालुका प्रमुख प्रदिप ठाकूर , तालुका संपर्क प्रमुख जे. पी. म्हात्रे उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे,द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर,ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटक धीरज बुंदे , उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर,शहर तालुका संघटक सुजाता गायकवाड, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक अतूल ठाकूर, नगरसेविका वर्षा पाठारे आदि मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Uddhav Thackerayउद्धव ठाकरे