शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

पर्यावरण रक्षणासाठी पेण वनविभाग सरसावला; इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:37 PM

वनराई संरक्षणासाठी वनक्षेत्रावर करडी नजर

पेण : पृथ्वीच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक चक्रावर ठिकठिकाणी अनिष्ट परिणाम झालेले दिसून येतात. सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी समूहांना अनेक राष्ट्रात जीवितहानीसह मोठ्या आर्थिक हानीचा सामना करावा लागतो. पृथ्वीवर येणारी ही नैसर्गिक संकटे रोखण्यासाठी झाडे वाचली पाहिजे, वनराईचे संरक्षण करण्याबरोबर सतत होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. सध्या कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते यासाठी पेणचा वनविभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रात कडक प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी इक ोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षणाची जबाबदारी वनखात्याकडे आहे. हौसेपोटी वृक्षावर कुºहाडीचे घाव घालणारे हात थांबवावे. त्याचबरोबरीने झाडांचा पालापाचोळा, केळीची पाने, गोवºया याद्वारे पर्यावरणपूरक अशाप्रकारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले.पेण वनविभागाची व्याप्ती सुमारे ९ हजार ९०० चौ. मी. असून या क्षेत्रात पानझडी जंगलाचा समावेश आहे. या क्षेत्रात सात राऊंड असून सात वनपाल व २५ वनरक्षकांद्वारे या वनांचे संरक्षण केले जाते. गेल्या काही वर्षांपासून शतकोटी वृक्षलागवडीमुळे, नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागले आहे. हौसमौज व उत्साहामुळे होळी सणाच्या वेळी विशेषत: कोकणात मोठ्या प्रमाणावर जी वृक्षतोड होत होती ते प्रमाण आता कित्येक पटीने कमी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या लोकांचा दृष्टिकोन बदलला असून पर्यावरणाला मारक ठरणाºया अनेक गोष्टी लोकांकडून बहिष्कृत होवू लागल्यात. हे चांगले सुलक्षण असून पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यावर शहरी भागातील नागरिकांनी भर दिला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करण्यासाठी पेण वन विभागाच्या कार्यालयीन ग्राऊंडमध्ये गोवºया, पालापाचोळा, केळीची पाने यांचा वापर करून होळी सणाच्या इकोफे्रं डली डेमोचे प्रात्यक्षिक सादरीकरण वनविभाग व वृक्षप्रेमींतर्फे केले जात आहे.पर्यावरणपूरक होळी सण साजरा करण्यासाठी आम्ही व्यापक मोहीम हाती घेतली असून पेण शहर व ग्रामीण परिसरातील सरपंच, नागरी संकुलातील सोसायट्यांचे प्रमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करून शालेय विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरणपूरक होळी डेमो सादरीकरणातून दिवसात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेद्वारे वृक्षतोड थांबविणे हाच उद्देश आहे.- प्रसाद गायकवाड,वनक्षेत्रपाल पेणवृक्ष हे मानवी जीवनाला आवश्यक असे प्राणवायू देणारे प्राणसंजीवक मित्र असल्याने सतत बदलणारे तापमान, येणाºया नैसर्गिक आपत्ती हे सर्व थांबवायचे असेल तर वृक्षतोड करू नये. होळीचा सण इकोफ्रेंडली साजरा करावा.- प्रा. उदय मानकवळे, वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Holiहोळीforest departmentवनविभाग