रायगड - पेण मळेघरवाडी अत्याचार आणि हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. त्याचप्रमाणे या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पेण येथे दिली. या प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करण्यात येईल. जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल. जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.
पेण अत्याचार, हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार - शंभुराजे देसाई, गृहराज्य मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 16:53 IST
Pen rape and murder case : आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.
पेण अत्याचार, हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार - शंभुराजे देसाई, गृहराज्य मंत्री
ठळक मुद्देजास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल. जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.