शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

मुरुडमध्ये शेकापचे पाच ग्रामपंचायतींवर वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:58 IST

मुरुड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न होऊन आज तहसील कार्यालयाच्या दालनात मतमोजणीस सुरुवात झाली

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न होऊन आज तहसील कार्यालयाच्या दालनात मतमोजणीस सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ गावातील अनेक ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतीचा निकाल ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती.यावेळी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले तेव्हा या १४ पैकी पाच ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे थेट सरपंच व सदस्य येऊन एकहाती सत्ता घेण्यात यशस्वी ठरले आहेत.शेतकरी कामगार पक्षास राजपुरी,विहूर,काशीद,भोईघर,तळेखार या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले आहे तर शिवसेनेला बोर्ली,शीघ्रे,मांडला या ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. मुरु ड तालुक्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाने मिथेखार ही ग्रामपंचायत एकहाती सत्ता स्थापन करून थेट सरपंच व ११ पैकी १0 सदस्य निवडून आणून सर्वांचे लक्ष वेधले आहे. आगरदांडा ही ग्रामपंचायत विकास आघाडीने जिंकली आहे.तर नांदगाव ग्रामपंचायत काँग्रेस,शेकाप व शिवसेना आघाडी करून सदरची निवडणूक जिंकली आहे. वळके ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट सरपंच पदाचे उमेदवार किशोर काजारे हे निवडून आले परंतु त्यांना आपल्या सर्व सदस्यांना निवडून आणता आलेले नाही.त्यामुळे सरपंच पद मिळाले परंतु बहुमत प्राप्त करता आले नाही. साळाव ग्रामपंचायतीवर शिवसेना शेकाप व राष्ट्रवादी अशी आघाडी करण्यात येऊन येथे त्यांना भरघोस यश प्राप्त करता आले आहे. चोरढे ग्रामपंचायतीवर थेट सरपंच पदाचा अर्ज दाखल न झाल्याने सदरची सरपंच पदाची निवडणूक होऊ शकलेली नाही. येथे फक्त सदस्य निवडून आलेले आहेत.राजपुरी ग्रामपंचायतीवर पूर्वापार शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे.परंतु या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी अलका मोंनाक यांनी भाजप तर्फे आपला अर्ज दाखल केला तर शेतकरी कामगार पक्षाच्या हिरकणी गिदी यांच्यात थेट लढत झाली. शेकापच्या हिरकणी गिदी यांना १२६१ मते मिळाली तर भाजपच्या अलका मोंनाक यांना ८६६ मते मिळाली आहेत.येथून शेतकरी कामगार पक्षाचे बहुसंख्य सदस्य सुद्धा निवडून आलेले आहेत.बोर्ली ग्रामपंचायतीमध्ये मोठी चुरशीची लढाई पाहावयास मिळाली आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर यांच्या पत्नी अस्मिता चुनेकर या शेतकरी कामगार पक्षातर्फे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांना ११४७ मते मिळाली तर शिवसेनेचे नौशाद दळवी यांना १२९२ मते मिळाली तब्बल १४५ मतांनी नौशाद दळवी यांनी शेकापच्या उमेदवाराचा पराभव केला.या ठिकाणी लोकांनी व्यक्ती पाहून मतदान केल्याचे दिसून येते. कारण असे की, या ग्रामपंचायतीवर ११ ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यापैकी शिवसेनेचे फक्त तीन सदस्य तर बाकीचे सर्व सदस्य शेकापचे आले आहेत.नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस,शिवसेना व शेकाप अशा आघाडीतर्फे वैशाली पवार यांना १३७४ मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या तारा वाघमारे यांना फक्त ९२७ मते मिळाली आहेत.येथे थेट सरपंचसह या आघाडीचे सर्वाधिक सदस्य सुद्धा निवडून आलेले आहेत. विहूर ग्रामपंचायतीवर शेकापच्या निकिता निलेश दिवेकर या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.तर येथे सदस्य ही शेकापचे आलेले आहेत.मिथेखार ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे सुवर्णा सुशील चवरकर यांना थेट सरपंच पदासाठी ११७७ मते मिळाली तर शेकाप व शिवसेनेच्या अस्मिता चवरकर यांना ५९७ मते मिळाली. येथे अकरापैकी दहा सदस्य हे भाजपचे आलेले आहेत. वळके ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किशोर काजारे यांना ९५७ मते तर परेश चवरकर यांना ७६९ मते मिळाली.येथे ११ सदस्यांपैकी पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आलेले आहेत.श्रीवर्धन तालुक्यातशिवसेनेचे वर्चस्वलोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या सहा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात शिवसेनेने चार ठिकाणी विजय मिळविला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन ठिकाणी यश आले आहे.आगामी काळात येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शक्ती सामर्थ्य वाढण्यासाठी सर्व पक्षांनी कसोशीने प्रयत्न केले होते. परिणामी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा प्रतिष्ठेची बनली होती. वडशेतवावे १४५, गाणी २१, वाकळघर ७८ व दांडगुरी २७ या मताधिक्याने येथे शिवसेनेचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बागमांडला व खारगाव येथे विजय प्राप्त केला आहे. खारगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकांपैकी वाकळघर ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेचे अनंत गुजर, गाणी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेच्या श्रुती धाडवे, दांडगुरी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेचे गजानन पाटील, वडशेतवावे सरपंचपदी शिवसेनेचे मळेकर विजयी झाले आहेत. तर बागमांडला ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य शिवसेनेचे, मात्र सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनघा अजित भाटकर विजयी झाल्या आहेत. तर खारगाव ग्रामपंचायत बिनविरोध राष्ट्रवादीकडे असल्याचे दिसत आहे. खारगाव ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादीचे दिलनवाज मुुखत्यार सोंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.खालापुरामध्ये सेना, राष्टÑवादीची बाजीलोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : खालापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २७ मे रोजी पार पडल्या होत्या. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून या निकालात तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीपैकी १0 ठिकाणी राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे तर शिवसेनेचे १0 तसेच भाजप १, मनसे १ व यामधील ४ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे खालापुरात राष्ट्रवादीच्या बरोबर संख्येने ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकविल्याने सेनेने दमदार एंट्री केल्याने आगामी होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत सेनेला फायदा होईल अशी चर्चा सुरु आहे .खालापूर तालुक्यात २२ ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून या निवडणुकीत २२ सरपंच पदासाठी व १४१ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती तर निवडणुकीपूर्वीच ३६१ सदस्य पदापैकी ६१ सदस्य तर खानाव वरोसे ,वावर्ले,शिरवली बिनविरोध सरपंच निवड झाली .तसेच उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सावरोली, जांबरूंग खरवाई, तांबटी, माजगाव, अत्कारगाव, होनाड नंदनपाडा, वासंबे ,चांभार्ली नारंगी विजय संपादन केला.