शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बेलापूर -नेरुळ- खारकोपरदरम्यान प्रवासी वाहतूक संध्याकाळी पाचनंतरच पूर्ववत सुरू होणार, जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:45 IST

Kharkopar Local Accident : बेलापूर -नेरुळ- खारकोपर दरम्यान रुळावरून लोकल घसरल्याने या मार्गावरील बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक किमान आज संध्याकाळी पाचनंतरच पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

- मधुकर ठाकूरउरण -  बेलापूर -नेरुळ- खारकोपर दरम्यान रुळावरून लोकल घसरल्याने या मार्गावरील बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक किमान आज संध्याकाळी पाचनंतरच पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.  मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बेलापूरहून खारकोपर स्टेशनला जाणाऱ्या  लोकल ट्रेनचे तीन डब्बे खारकोपर स्टेशनमध्ये प्रवेश करताना रुळावरून घसरले आहेत.यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही इजा झालेली नाही. रिलीफ ट्रेन घटनास्थळी पोहचल्या असून रुळांवरून घसरलेले डबे हटविण्यात येत असुन गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.दरम्यान बेलापूर -नेरुळ- खारकोपर या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

साधारणपणे घसरलेले तीनही कोचेस ऑफ दि ट्रॅक करण्यात आल्यानंतच मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.साधारणता संध्याकाळी पाचनंतरच प्रवासी वाहतूक पुर्ववत होईल असा अंदाज सेंट्रल रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी व्यक्त केला आहे.फक्त बेलापूर-नेरुळ- खारकोपर मार्गांवरील प्रवासी वाहतूकच बंद आहे. हार्बर , मेन लाईन आणि इतर मार्गांवरील वाहतूक सुरळीत सूरु आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई