शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
4
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
5
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
6
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
7
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
8
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
9
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
10
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
11
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
12
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
13
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
14
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
15
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
16
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
17
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
18
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
19
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
20
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...

शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी व्हावे- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:09 IST

Raigad News : शेतकऱ्यांना या बंदमध्ये देशातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे.

अलिबाग - केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत, या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या पाच फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्याच्या या ‘भारत बंद’ला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.शेतकऱ्यांना या बंदमध्ये देशातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशभातील शेतकऱ्याचे राजधानी दिल्लीत घेराव आंदोलन सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत अक्षम्य अनास्था दाखवित आहे. सरकारच्या आठमुठ्या धोरणांमुळे शेतकरी शिष्टमंडळासोबतच्या आतापर्यंत सर्व बैठका व वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत. आंदोलनकारी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक  दिली आहे. शेतकऱ्यांच्या या हाकेला देशभरातील जनतेने प्रतिसाद देऊन हा भारत बंद उत्स्फूर्तपणे यशस्वी करावा, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड