शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शेकापच्या सहकार्याने पार्थ यांच्या गाठीभेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 05:40 IST

युतीमुळे शिवसेनेतही उत्साह; पनवेल, उरणचे महत्त्व वाढले

- वैभव गायकर पनवेल : पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब होताच त्यांनी पनवेल आणि उरणमधील गाठीभेटींवर भर देण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांना सोबत त्यांनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी असलेल्या शेकापच्या नेत्यांनाही सोबत घेतल्याने प्रचारात खऱ्या अर्थाने ‘आघाडी’चे चित्र दिसू लागले आहे.मावळच्या राजकारणावर यापूर्वी दिसत नव्हता, एवढा प्रभाव सध्या रायगडच्या राजकारणाचा दिसतो आहे. जरी जिल्हयातील पनवेल, उरण हे दोनच मतदारसंघ त्या लोकसभेत मोडत असले, तरी त्याचे राजकीय महत्त्व गृहीत धरून पक्षाच्या हालचाली सुरू आहेत.सध्या पनवेल विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे, तर उरण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी या दोन्ही मतदारसंघांतून शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघातून विजय मिळविला. श्रीरंग बारणे हे मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. युतीमुळे शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र शरद पवार यांनी नातवासाठी ही जागा निवडल्याचा आणि त्यासाठी स्वत: निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचा परिणाम येथील राजकीय घडामोडींवर स्पष्टपणे जाणवतो. पनवेलमधील शेकापची ताकद लक्षात घेता, सर्वप्रथम पार्थ यांनी शेकापचे आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेससह, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही यात सहभाग होता. नंतर उरणमधील पदाधिकाºयाचीही त्यांनी भेट घेतली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस