शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हवेतील उग्र दर्पाने पनवेलकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 01:59 IST

प्रदूषणात वाढ : रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येतो रसायनिक वायू

वैभव गायकर

पनवेल : दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी त्या ठिकाणी सम-विषम वाहने चालविण्यात येत असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पनवेलमध्ये उद्भवली आहे. शहरीकरणाबरोबर तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणामुळे पनवेलमधील वातावरण दिवसेंदिवस दूषित होत असून, रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूमुळे पनवेलकर त्रस्त आहेत. ज्येष्ठांबरोबरच लहान मुले, तरुणांमध्येही श्वासोच्छ्वासाचे आजार बळावत असल्याने दिसून येत आहे.

दिवाळीनंतर थंडी वाढते. त्याचबरोबरच धुके पसरायला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धुक्याबरोबरच वातावरणात धुराचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. धुक्याच्या आडून पनवेल, तळोजा एमआयडीसीतील काही कंपन्यांमधून दूषित विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जात आहेत.प्रदूषणाची आकडेवारीची माहिती देणाºया एका साइटवर गेल्या २४ तासांत हवेची सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५७ म्हणजेच आरोग्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेलमध्ये विशेषत: रात्रीच्या वेळी खारघर, कळंबोली, कामोठे तसेच एमआयडीसीतील काही भागात सध्या अतिशय उग्र दर्प अनुभवास येत आहे.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या विषय तर राष्ट्रीय हरित लवादामध्ये गेला आहे. लवादाने वेळोवेळी संबंधित यंत्रणेला दंड ठोठावला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत अद्यापही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ बेफिकीर असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचा फटका स्थानिकांबरोबरच खारघर, तळोजा नोड, पनवेल परिसरातील नागरिकांनाही बसत आहे. पनवेलमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राहुल मोटे यांच्याकडे विचारणा केली असता, प्रदूषणासंदर्भात राबविण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती फोनवर देता येणार नसल्याचे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. एकीकडे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना अधिकारी वर्ग मात्र जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले.उग्र वायूने नागरिक हैराणखारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल परिसरातील नागरिकांना संध्याकाळ होताच उग्र दर्पाला सामोरेजावे लागते. हा दर्प नवजात बालके, श्वसनाचात्रास असलेल्यांसाठी घातक आहे. याबाबतप्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.वायुप्रदूषणामुळे उद्भणारे आजारच्श्वासोच्छ्वासाचा त्रास बळावतो.च्घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ होणेच्स्मरणशक्तीवर परिणाम होतोच्चिडचिड वाढते.च्एकाग्रतेत बाधा येते.च्फुप्फुसांना सूज येते. परिणामी, रक्तवाहिन्या व हृदयाला इजा होण्याची शक्यता बळावते

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडpanvelपनवेल