शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Panvel Municipal Election Results 2026: पनवेलमध्ये 'विकासा'वर भाजपने विजय आणला खेचून

By वैभव गायकर | Updated: January 17, 2026 07:10 IST

विरोधकांतील समन्वयाचा अभाव अधोरेखित

वैभव गायकर

पनवेल: विरोधकांच्या समन्वयाचा अभावाचा फायदा घेऊन विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणाऱ्या भाजपने पनवेल महापालिकेवर दुसऱ्यांदा झेंडा फडकवला. प्रदूषण, पाणीटंचाई आणि वाढीव मालमत्ता करावर प्रचंड राजकारण सुरू असताना हे विकासाच्या राजकारणात महत्त्वाचे मुद्दे मागे पडले. भाजपने सात जणांना बिनविरोध विजयी करून महाविकास आघाडीवर पहिलाच जोरदार धक्का दिला होता. त्यामुळे पुढील काळात सर्व मुद्दे मागे पडले आणि केवळ बिनविरोध उमेदवारांच्या अवतीभवती ही निवडून लढवली गेली. त्यातच निवडणुकीपूर्वी २० पेक्षा जास्त महत्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पाडले. त्याचाही लाभभाजपला झाला.

सोशल मीडिया, प्रत्यक्ष प्रचारात विकासाचा मुद्दा सातत्याने अग्रस्थानी ठेवल्याने भाजपाला याचा फायदा झाला. तर शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या व्यतिरिक्त एकही नेता कुठेही फिरला नाही. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला

ठाकूर बंधुंचा प्रचार फलदायी

७१ जागांपैकी ५६ जागांवर विजय संपादन केला. सभागृह नेते राहिलेले परेश ठाकूर यांनीदेखील स्वतः निवडणुकीतून माघार घेत पक्ष संघटनेला महत्त्व दिले. त्यांनीदेखील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून संपूर्ण पालिका क्षेत्रात प्रचारात आघाडी घेतली. उर्वरित कोणत्याच पक्षाला दोन अंकी आकडा गाठता आला नसल्याने भाजपचे सूक्ष्म नियोजन, प्रभावी नेतृत्व तसेच योग्य उमेदवारांच्या निवडीमुळे प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या यशाचे खरे मानकरी ठरले.

मुख्यमंत्री, मंत्र्यांची फौज कामी

भाजपने मात्र नेते, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, राज्यातील मंत्री यांची फौज विविध प्रभागात उतरविल्याने त्याचा फायदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी झाला. प्रत्येक आघाडीवर भाजपने पुढाकार घेतला. उलटपक्षी महाविकास आघाडीत शेवटच्या क्षणापर्यंत समन्वयाचा अभाव दिसून आला. शेजारील उरण नगरपरिषदेवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष विराजमान झाले. मात्र त्या निवडणुकीचा प्रभावदेखील पनवेल महापालिकेवर महाविकास आघाडीला पाडता आला नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Secures Panvel Victory in 2026 Municipal Elections on Development Agenda

Web Summary : BJP retained Panvel, capitalizing on opposition disunity and focusing on development, despite issues like pollution. Early victories and project inaugurations boosted their campaign. Strong leadership and strategic planning ensured a decisive win, while the opposition lacked coordination.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा