शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

पाली - खोपोली रस्त्याकडे दुर्लक्ष; खड्डे, धुळीचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 00:38 IST

रुंदीकरणाचा मूळ रस्त्याला फटका; स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात

- विनोद भोईर पाली : पाली ते खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. रुंदीकरण करताना सध्या वाहतूक होत असलेल्या रस्त्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर निघाल्याने खडी बाहेर आली आहे. या खडीवरून दुचाकी, चारचाकी वाहने घसरत असल्याने अपघात होत आहेत. रुंदीकरणापूर्वी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे परिसरातील नागरिक तसेच चालकांचे म्हणणे आहे.रुंदीकरणामुळे साइडपट्टी तोडण्यात आल्या आहेत. शिवाय मातीचा भराव टाकल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांची सतत वर्दळ असल्याने रस्त्यावर मातीचा धुरळा उडतो. चालकांना वाहन चालविताना अडचणी येत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराने वाहतुकीचा रस्ता सुरळीत न केल्यास पाली व्यापारी असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक ओसवाल यांनी दिली आहे.पाली-खोपोली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यात जोमात सुरू होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद होते. या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, महामार्गाचे काम सुरु करावे आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून द्यावा असे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु कंत्राटदार रस्ता रुंदीकरणावर भर देत वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.पाली ते खोपोली फाटा हा साधारण पस्तीस किमीच्या रस्त्यात काही ठिकाणी रु ंदीकरणाचे काम सुरू आहे. यात ज्या रस्त्यावरील भाग काँक्रीटचा झाला आहे त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु काँक्रीटचा रस्ता सुरू होतो, त्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहने आदळतात. वाहने आदळू नये म्हणून चालक अचानक ब्रेक दाबत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पाली-खोपोली रस्त्याचे काम आता वेगाने सुरू होईल, अशी शक्यता आहे.काम संथगतीने चालकांमध्ये नाराजीवर्दळीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाली-खोपोली महामार्गावरून मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, तहसीलदार तसेच उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी यांचे जाणे - येणे असते. परंतु या त्रासाबद्दल कोणीच काही बोलत नाही.पालकमंत्र्यांनी रस्त्याची पाहणी करून रुंदीकरणाच्या कामापेक्षा अगोदर वाहतुकीचा रस्ता सुरळीत करण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत, अशी मागणी होत आहे.रुंदीकरणापेक्षा पीडब्ल्यूडीच्या ताब्यात असलेला रस्ताच बरा होता अशी प्रतिक्रि या आता लोकांमधून येत आहे. हे काम असेच संथ गतीने सुरु राहिले तर पुढील पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीयोग्य राहणार नाही.पाली-खोपोली मार्गावरील जो रस्ता अजून रुंदीकरणासाठी घेतलेला नाही, तेथे मूळ डांबरी रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहनचालकांना गाडी चालवताना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.दुपदरी रस्त्याचे रुंदीकरण होऊन रस्ता मोठा होणार असला तरी जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतुकीसाठी वापरला जाणारा रस्ता हा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.अतिशय खराब झालेल्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गावर ज्या ठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी मातीचा भराव घातला असून वाहनांमुळे धुराळा उडत आहे. यामुळे या भागातील अनेक जणांना त्वचा रोग आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे.

टॅग्स :Raigadरायगडroad transportरस्ते वाहतूक