शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

पाली-खोपोली राज्यमार्ग अवघ्या बारा तासांत पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:13 IST

मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती.

जयंत धुळपअलिबाग : मुसळधार पावसामुळे खोपोली-पाली राज्यमार्गावरील पूल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण आणि बांधकाम विभागाच्या समन्वयाने अवघ्या बारा तासांत युध्दपातळीवर काम करून हा पूल बांधण्यात आल्याने राज्यमार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे पाली - खोपोली रस्त्यावरील खुरावले फाट्याजवळील पूल सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास वाहुन गेला. अपघात रोखण्यासाठी पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी वाहतूक बंद केली. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी जड वाहने वाकण फाट्यावरून पेण मार्गे वळविली, तर लहान वाहनांची रहदारी उद्धर मार्गे वळविण्यात आली.जिल्ह्यात नुकताच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग निर्माण मंत्रालयाने वाकण- पाली-खोपोली हा रस्ता एनएच ५४८-अ राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. या रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी खुरावले फाट्याजवळ रस्त्याच्या निम्म्याभागाचे काम सुरु होते व जुन्या निम्म्या भागावरून रहदारी सुरु होती. या ठिकाणी असलेला छोटा पूल (पाइप मोरी) संततधार पावसामुळे आलेल्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहून गेली. त्यावेळी पालीचे तहसीलदार बी.एन. निंबाळकर पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रियेत व्यस्त होते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते लगेचच घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना देण्यात आली.लगेचच रायगड पोलीस, महसूल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे ठेकेदार या सर्वांचा समन्वय ३० मिनिटांत साधण्यात आला. घटनास्थळी निंबाळकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, पालीचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी पोहोचले.दीड तासात पुलाच्या उभारणीचे काम सुरूदोन हायड्रा मशिन्स, दोन जेसीबी आणि दोन पोकलॅन्डच्या मदतीने सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नव्या पुलाच्या उभारणीस सुरु वात करण्यात आली. पुलाचे जुने पाइप ६०० मिमीचे होते. ते हटवून त्या ठिकाणी १२०० मिमीचे सिमेंट पाइप टाकणे आवश्यक होते. तेथून जवळच जांभूळपाडा येथे याच रस्त्याच्या कामाचा डेपो होता तेथून तातडीने पाइप आणले.रस्त्याचा भराव मोकळा करून पाइप टाकण्यासाठी जागा तयार करून पाइप टाकण्यात आले. रस्त्यावरून रहदारी पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहतूक मात्र अद्याप सुरु केलेली नाही. अर्थात ही तात्पुरती व्यवस्था आहे, पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या निम्म्या भागाचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर त्यावरु न रहदारी वळवून उर्वरित भागाचे काम पुन्हा करण्यात येईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे यांनी दिली आहे.