शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक विभागाचा दणका, झोपडी न पाडण्याचे एमएमबीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:08 IST

झोपडी पावसाळ्यात तोडू नये, याबाबत त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, मुफीद यांना पूर्वी देण्याची ठरलेली पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश अल्पसंख्याक आयोगाने एमएमबीला दिले आहेत.

अलिबाग : महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या (एमएमबी) जागेमधील अतिक्रमण हटवण्याआधी मुफीद हाफसाणकर यांची झोपडी पावसाळ्यात तोडू नये, याबाबत त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, मुफीद यांना पूर्वी देण्याची ठरलेली पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश अल्पसंख्याक आयोगाने एमएमबीला दिले आहेत.हाफसाणकर कुटुंबाला न्याय मिळवा यासाठी ‘लोकमत’ने हे वृत्त २१ जून रोजीच्या अंकात दिले होते. ‘लोकमत’ने सर्वसामान्यांची बाजू मांडल्यामुळेच न्याय मिळाल्याचे मुफीद याने स्पष्ट करून ‘लोकमत’चे आभार मानले. येथील महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या (एमएमबी) जागेमध्ये गेली ६२ वर्षे एक मुस्लीम कुटुंब राहत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच एमएमबीने त्यांना जमीन खाली करून देण्याबाबत नोटीस काढली होती. त्यामुळे त्या कुटुंबाची चांगलीच धावपळ झाली होती. पावसाळा संपल्यावर नजीकच्या जागेमध्ये स्थलांतरित होण्याचे मुस्लीम परिवाराने मान्य केल्यावरही एमएमबीने त्यांच्या राहत्या घरावर हातोडा पाडला होता. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे अलिबाग शहरामध्ये पसरताच एमएमबीच्या कार्यालय परिसरामध्ये मुस्लीम समाजासह हिंदू समाजातील नागरिकांनी गर्दी केली. भर पावसाच्या हंगामामध्ये एका कुटुंबाला बेघर करण्याच्या घटनेमुळे नागरिक प्रचंड संतापले होते. त्यांनी एमएमबीच्या कृत्याला कडाडून विरोध केला. मात्र, एमएमबी ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हती. हाफसाणकर कु टुंबाला जागा खाली करण्याची नोटीस आधीच दिलेली आहे, तसेच वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश आहेत, त्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याचे एमएमबीचे सहायक बंदर अधिकारी अजित टोपणो यांनी स्पष्ट केले. त्यावर हाफसणकर यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. जुनेद घट्टे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले आहे, त्यामुळे असा एकतर्फी निर्णय घेता येणार नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या केसचा नंबरही अ‍ॅड. घट्टे यांनी दाखवला.मुफीद यांना अल्पसंख्याक आयोगाकडे दाद मागितली. आयोगाने एमएमबीला झोपडी न तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुफीद यांना देण्यात आलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये भराव टाकून देण्यात येणार आहे. न्याय मिळाल्याने मुफीद आणि त्याच्याकु टुंबाने ‘लोकमत’चे अभार मानले.