शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपती अशोक मित्तल यांच्या आलिशान रिसॉर्टवर उद्या फिरणार बुलडोझर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:48 IST

प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांच्या अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील आलिशान हॉलिडे रिसॉर्टवर रायगड जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर फिरणार आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांच्या अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील आलिशान हॉलिडे रिसॉर्टवर रायगड जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर फिरणार आहे. सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केल्याने शुक्रवारी 8 नोव्हेंबरपासून कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत यंत्रसामुग्री उपलब्ध केली असती, तर गुरुवारीच कारवाईचा इरादा केला हाेता, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

1 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मित्तल यांच्या अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशोक मित्तल यांना 21 एप्रिल 2019 पूर्वी अनिधकृत बांधकाम स्वत:हून पाडावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली होती. मित्तल यांनी स्वत:हून बांधकाम पाडण्यास सुरुवात केली होती, परंतु त्यांच्यामार्फत पूर्ण बांधकाम पाडण्यात आले नव्हते. तसेच प्रशासनाने दिलेली मुदत संपल्याने आता जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

बॉम्बे इन्व्हायरमेन्ट ऍक्शन ग्रुपसह अन्य काहींनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयाने अशोक मित्तल यांनी अनधिकृतपणे केलेले बांधकाम पाडण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे 8 फेब्रुवारी 1999 मध्ये पूर्वीच्या मालकाकडून पाच एकर जागा विकत घेतली होती. पूर्वीच्या मालकाने मित्तल यांना जागा विकण्याआधी या पाच एकर जागेत 514 स्क्वेअर मीटरचे बांधकाम, एक पाण्याची टाकी, पाच मीटरपेक्षा जास्त उंच नसलेली भिंत बांधण्याची परवानगी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून 4 डिसेंबर 1998 रोजी घेतली होती. त्यानंतर त्या मालकाने ही जागा अशोक मित्तल यांना विकली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी आधीच्या मालकाला दिलेल्या बांधकाम परवानगीपेक्षा अशोक मित्तल यांनी जिल्हाधिकारी यांची वाढीव बांधकामबाबत परवानगी न घेता 1407 स्क्वेअर मीटरचे अनिधकृत वाढीव बांधकाम केले.या अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत मित्तल यांनी जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे परवानगी मिळण्याबाबत अर्ज केला होता. जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांनी हा अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. या निकालाबाबत मित्तल यांची पत्नी निरुपम अशोक मित्तल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मित्तल यांचे अपील फेटाळले होते. प्रशासनाला अधिकृत बांधकाम शाबीत ठेवून अनिधकृत बांधकामावर जेसीबी फिरवायची आहे. त्यामुळे कोणते बांधकाम ठेवायचे हा एक प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील किहीम येथील डायमंड किंग नीरव मोदी, धोकवडेमधील कुंदनमल तर मांडवा येथील कोठारी या बिगशॉट उद्योजकांचे अनधिकृत बंगले जिल्हा प्रशासनाने आधीच भुईसपाट केले आहेत. प्रशासनाने अन्य  580 जणांना नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची कु-हाड पडणार असल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :alibaugअलिबाग