शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ऑरेंज अलर्ट! घराबाहेर पडताना जपून; चार दिवस बरसणार

By निखिल म्हात्रे | Updated: July 12, 2024 17:51 IST

वीकेंडवर पावसाचे पाणी पडणार?

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जाेरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. ही संततधार १६ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. हवामान विभागानेही ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असल्याने वीकेंडवर पावसाचे पाणी पडणार आहे.

जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे भात लावणीची कामे वेगाने सुरू आहेत. मागील दोन ते तीन दिवस ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. शुक्रवारी पहाटे जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. तर, जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला.हवामान विभागाने पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सतर्कता बाळगावी लागणार आहे. तर, हा वीकेंड घरात व्यतीत करावा लागणार आहे.

चौल बायपासवर वृक्षाचा गतिरोधक

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे चौल बायपास येथील भलेमोठे झाड रस्त्यातच कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली असून, झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम स्थानिकांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जात आहे.शुक्रवारी सकाळी आठ वाजतापर्यंत पडलेला पाऊस

अलिबाग - ९१, पेण - ५५, मुरुड - ५० मि.मी., पनवेल - ७८, उरण - ३९, कर्जत - ६३, खालापूर - ४५, माणगाव - ३२, रोहा - २६, सुधागड - ४६, तळा - ५८, महाड - २७, पोलादपूर - १५, म्हसळा - ३१, श्रीवर्धन - २३, माथेरान - ८६.

टॅग्स :alibaugअलिबागRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस