शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

सरकारच्या निर्णयाला विरोध

By admin | Updated: January 23, 2016 03:11 IST

फणसाड अभयारण्य परिसरातील हद्दीपासून १०० मीटरपासून २.७५ कि.मी.पर्यंतच्या एकूण ४३ गावांलगतचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या शासन

मुरुड : फणसाड अभयारण्य परिसरातील हद्दीपासून १०० मीटरपासून २.७५ कि.मी.पर्यंतच्या एकूण ४३ गावांलगतचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या शासन निर्णयाविरुद्ध पंचक्रोशीतील मुरुड व रोहा तालुक्यातील भूमिपुत्रांनी तीव्र विरोध केला असून, या निर्णयामुळे बाधित गांवातील शेतकरी तीव्र जनआंदोलन करतील, असा इशारा मुरुड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नितेश देशपांडे व तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष महाडिक यांनी दिला आहे.मुरुड तालुक्यातील ३०, तर रोहा तालुक्यातील १३ गावांचा समावेश इकोझोनमध्ये करण्यात आल्याची अधिसूचना ३० नोव्हेंबर २०१५ मध्ये नमूद करण्यात आली असून, सदरहू अधिसूचनेविषयी हरकती सचिव, पर्यावरण व वन मंत्रालय, न्यू दिल्ली येथे वा ीू९-ेीा@ल्ल्रू.्रल्ल या ईमेलवर ६० दिवसांच्या आत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुकाणू समितीच्या बैठकीस सुभाष महाडिक, नितेश देशपांडे, नगराध्यक्ष अशोक धुमाळ, काशिनाथ महाडिक, ऋषीकांत डोंगरीकर, अ‍ॅड. इस्माइल घोले, मोअज्जम हसवारे, सरपंच मनोज कमाने, हाफीज कबले, प्रीतम पाटील, अजय कासार, सुधीर दांडेकर, इरफान हलडे, संदीप पाटील आदी मान्यवर तसेच व्यावसायिक व शेतकरीवर्ग उपस्थित होते.फणसाड अभयारण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यास उपस्थित कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवित या अधिसूचनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या तसेच पर्यटनपूरक उद्योग करणाऱ्यांवर संक्रांत कोसळणार असून, अल्पभूधारकांना मिळेल त्या किमतीत जमिनी विकाव्या लागणार असल्याची टीका करण्यात आली. मुरुड तालुक्यातील भौगोलिक रचना उत्तर-दक्षिण असल्यामुळे पश्चिमेस अरबी समुद्र व पूर्वेस डोंगराच्या रांगा आणि भरीस भर म्हणून सीआरझेडचा बडगा आणि ते कमी म्हणून की काय ईसीझेडचा अंमल त्यामुळे स्थानिकांची परिस्थिती ना घरका न घाटका अशी झाली असल्याचे अ‍ॅड. घोले यांनी सांगितले. फणसाड अभयारण्यात श्वापदांची संख्या वाढली असून, त्यांना पुरेसे खाद्य जंगलात न मिळाल्यामुळे अभयारण्यालगतच्या गावांतील नागरिकांना बिबट्यांपासून संरक्षण नसल्याबद्दलची चिंता सदरहू बैठकीत प्रकर्षाने चर्चिली गेली. स्थानिक आमदारांसह खासदार तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे केंद्र शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेला विरोध करण्याचे सुभाष महाडिक यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)