शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

रुग्णालयातील जैविक कचरा उघड्यावर

By admin | Updated: December 23, 2016 03:25 IST

उपजिल्हा रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, ही जबाबदारी त्या रुग्णालयाची

कर्जत : उपजिल्हा रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे. मात्र, हा जैविक कचरा उपजिल्हा रु ग्णालयाच्या आवारात टाकला जात आहे. त्यामुळे रु ग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न समोर येत आहे.नागरी घनकचरा अधिनियम २००० व जैविक घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी ) नियम १९८८ नुसार रु ग्णालयातून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी त्या-त्या रु ग्णालयाची आहे. कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात निर्माण होणारा कचरा संकलित करून, विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे येथे पाठविला जातो, असे असतानाही कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात गोळा होणारा कचरा हा दवाखान्याच्या आवारातच असलेल्या शवविच्छेदनगृहाच्या बाजूला टाकला जात आहे, त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्याचा त्रास रुग्णालयाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होत आहे, त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्र ारी के ल्यावर माध्यमांना कळताच, दुसऱ्या दिवशी हा जैविक कचरा जाळण्यात आला. तीन दिवसांपूर्वी उपजिल्हा रु ग्णालयातील कुपोषित मुलांसाठी सुरू केलेल्या बाल उपचार केंद्रास भेट देण्यासाठी आलेल्या आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हा रु ग्णालया बरोबर आवाराची पाहणी केली, त्या वेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैविक कचरा जाळण्यात आल्याचे चित्र स्पष्ट दिसले. त्या ठिकाणी उपस्थित नर्स यांना आमदार सुरेश लाड यांनी हे काय आहे? असा प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत. याबाबत आमदार लाड यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)