शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानसाठी ई-रिक्षाच फायदेशीर; टिसचा अहवाल; दळणवळण व पर्यावरणाचा प्रश्न निघणार निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 10:01 IST

माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे आतापर्यंत कोणतेही वाहतुकीचे साधन नव्हते

माथेरान : तीन महिन्यांच्या पायलट प्रकल्पानंतर बंद असलेली माथेरानमधील ई-रिक्षांची कायमस्वरूपी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टाटा सामाजिक संस्थेचा (टिस) अहवाल रिक्षा संघटनेला माहिती अधिकारात मिळाला आहे. यात ई-रिक्षाच येथील दळणवळण व पर्यावरणाचा ऱ्हास या समस्येवर एकमेव तोडगा आहे. त्यामुळे घोड्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर अंकुश येऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे आतापर्यंत कोणतेही वाहतुकीचे साधन नव्हते. हातरिक्षा हा एकमेव पर्याय होता. मात्र या हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तता व्हावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी याचिका  दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये निकाल देत पर्यावरणपूरक ई-रिक्षांच्या वाहतूक सेवेला तात्पुरती मंजुरी दिली होती. पायलट प्रकल्प राबवून परिणामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार राज्य सरकारने माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून ई-रिक्षांचा पायलट प्रकल्प राबवला.  

प्रा. सुहास भस्मे व प्रा. चैतन्य तलरेजा यांच्या नेतृत्वाखाली इतर सदस्यांनी २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान अभ्यास केला. यात ७६ अश्वपालक, ३६ हातरिक्षा चालक, ७४ हमाल, १०१ गृहिणी आणि ७९ प्रवाशांशी चर्चा करीत अहवाल दिला. टिसने ई-रिक्षा सुरू होण्यापूर्वी १५ विविध घटकांवर होणारे परिणाम व ई-रिक्षा सुरू झाल्यानंतरचा बदल नोंदविला आहे.

पीडित घटकांना आर्थिक साहाय्य देण्याची सूचना ई-रिक्षाची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता ही ५३.७६ केजे इतकी आहे. ती इतर वाहनांपेक्षा सर्वात कमी असल्याचे निरीक्षण नोंदवत ई-रिक्षा कायमस्वरूपी सुरू करण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने व गरजेनुसार संख्या वाढवावी. ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर ज्या घटकांवर आर्थिक परिणाम होऊ शकतो अशा व्यक्तींसोबत सरकारने संवाद साधून त्यांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही टिसने केली आहे.

काही अश्वपालकांनाही ई-रिक्षा हवी ई-रिक्षा सुरू झाल्यास अश्वपालकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र काही अश्वपालकांनी ई-रिक्षा ज्येष्ठ नागरिक व महिलांना फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याचा फायदा आम्हालाही होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण