शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

रायगडमधील ४४ हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा; पालकांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:18 IST

जिल्ह्यात एकूण २ लाख ४२ हजार ४२५ विद्यार्थी

अलिबाग : यंदा २०२० शैक्षणिक वर्ष केवळ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाया जात आहे. मात्र अद्याप कोरोना संसर्ग रोखणारी लस नसल्याने शिक्षणाचे आॅफलाइन वर्ग सुरू करणे दुरपास्त असल्याने सरकारने आॅनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे. रायगड जिल्ह्यात ४४ हजार ४१० विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणारा स्मार्ट फोन, टीव्ही आणि रेडिओ या सुविधा उपलब्ध नाहीत. आॅनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणारी साधने खरेदी करणे या पालकांच्या खिशाला परवडणारे नाही. यामुळे शिक्षण विभागाचा आॅनलाइन शिक्षणाचा फंडा रायगडमधील पालकांसाठी अर्थिक भुर्डंद ठरत आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊन घोषित झाल्याने शाळा, महाविद्यालये अद्यापही बंदच ठेवण्यात आली आहे. शिक्षण विभागाचे आॅनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या ३ हजार ७२२ शाळांमध्ये २ लाख ४२ हजार ४२५ विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याचा रायगड जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. परंतु ग्रामीण भागातील ४४ हजार ४१० पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ८८ हजार ३८५ पालकांकडे स्मार्ट मोबाइल फोन आहे. त्यांना नेटवर्कचा अडथळा येत आहे. १ लाख २८ हजार ३२४ विद्यार्थ्यांकडे टीव्हीची उपलब्धता आहे. तर १२ हजार ५३६ विद्यार्थ्यांकडे रेडिओची सुविधा उपलब्ध आहे. असे असले तरी विजेचा पुरवठा खंडित होणे आणि सिग्नल न मिळणे अशा अडचणींना विद्यार्थी आणि पालकांना सामोरे जावे लागत आहे.

रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा असला तरी १५ तालुक्यांमधील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मजूर आहेत. मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे मजुरांची फरफट झाली. आता खरीप हंगामातील शेतीचे कामे लागल्यामुळे मोलमजुरी मिळत आहे. त्यातून घरखर्च चालवावा की, मुलांना आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट सुविधा उपलब्ध करवून द्याव्यात, असा प्रश्न मजुरांपुढे उभा राहिला आहे. जर आॅनलाइन शिक्षण द्यायचेच असेल तर पहिले आमच्या पाल्यांना स्मार्ट फोन द्यावा आणि ग्रामीण भागातील नेटवर्क सुरळीत करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

८८ हजार ३८५ विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन

1रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया ८८ हजार ३८५ विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहे. यामध्ये अलिबाग ६ हजार ३४५, कर्जत ५ हजार ४४६, खालापूर ३ हजार ४९१, महाड १० हजार ५५६, माणगाव १ हजार १७४, म्हसळा १ हजार ४४५, मुरु ड ३ हजार ९४६, पनवेल १२ हजार १, पेण २० हजार ३४०, पोलादपूर १ हजार २३८, रोहा २ हजार ३६१, सुधागड ५६४, तळा ९२३, उरण १८ हजार ५५५ आणि श्रीवर्धन तालुक्यातील संख्या अद्याप शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही.१२ हजार ५३६ विद्यार्थ्यांच्या घरी रेडिओ

2रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया १२ हजार ५३६ विद्यार्थ्यांच्या घरी रेडिओ उपलब्ध आहे. यामध्ये अलिबाग १ हजार ९०५, कर्जत १५२, खालापूर ३२२, महाड ४५०, मुरु ड १४७, पनवेल १हजार ३००, पेण ३ हजार ४००, पोलादपूर २०६, रोहा ५३६, सुधागड २, उरण ४ हजार १३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. माणगाव, म्हसळा, तळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी रेडिओ असल्याची माहिती शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही.४४ हजार ४१० विद्यार्थ्यांकडे स्मार्ट सुविधा

3रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया ४४ हजार ४१० विद्यार्थ्यांकडे स्मार्ट सुविधा उपलब्ध नाहीत. यामध्ये अलिबाग १ हजार ५३१, कर्जत ८ हजार ६२९, खालापूर ३ हजार ६५४, महाड ३ हजार २५७, माणगाव २ हजार ९०३, म्हसळा २ हजार ८४९, मुरु ड १ हजार २५९, पनवेल १ हजार ७००, पेण ६ हजार २३२, पोलादपूर ४१३, रोहा ६ हजार १५२, सुधागड २ हजार ८३८, तळा ४४९, उरण २ हजार ५४५ आणि श्रीवर्धन तालुक्यातील संख्या अद्याप शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही.२ लाख ४२ हजार ४२५ विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही

4रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया २ लाख ४२ हजार ४२५ विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही उपलब्ध आहे. यामध्ये अलिबाग २७ हजार ९३९, कर्जत ६ हजार ८४२, खालापूर ५ हजार ९४४, महाड १७ हजार १२३, माणगाव, २ हजार ६०९, म्हसळा २ हजार ९८२, मुरु ड ५ हजार ३३५, पनवेल ६ हजार, पेण १६ हजार ८३२, पोलादपूर १ हजार ४४५, रोहा ९ हजार ९८, सुधागड १ हजार १८७, तळा ७७६, उरण २४ हजार २११ आणि श्रीवर्धन तालुक्यातील संख्या अद्याप शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही.

टॅग्स :Educationशिक्षणRaigadरायगड