शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत चार घरफोड्या, श्रीवर्धनमध्ये नागरिक भयभीत : पोलिसांपुढे चोरांचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:20 IST

श्रीवर्धन शहरानंतर आता घरफोडीचे सत्र दिघी सागरी पोलीस ठाणे असलेल्या बोर्ली पंचतनमध्ये चोरांनी सुरू केले आहे. मंगळवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरांनी घरफोडी केली असल्याची घटना घडली.

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन शहरानंतर आता घरफोडीचे सत्र दिघी सागरी पोलीस ठाणे असलेल्या बोर्ली पंचतनमध्ये चोरांनी सुरू केले आहे. मंगळवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरांनी घरफोडी केली असल्याची घटना घडली. एका ठिकाणी चोरांनी किरकोळ रोख रक्कम लांबविल्याचे समजते, तर याआधी शिस्ते येथील दिलीप बबन भायदे यांच्या घरीदेखील चोरांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने पोलिसांपुढे आता चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.मंगळवारी मध्यरात्री बोर्ली पंचतन येथील एसटी स्टँड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील मुख्य सभागृहाचे व कार्यालयाचे कुलुप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला; परंतु यामध्ये त्यांना काहीच हाती लागले नाही, त्यानंतर चोरांनी जवळील समतानगर येथील प्रभाकर खोपरे, काशिनाथ पेडणेकर, अरुण करंदेकर यांच्या राहत्या बंद घराचे कुलुप तोडून चोरांनी आतील कपाटांतून काही रक्कम किंवा घबाड मिळते का यासाठी प्रयत्न केले; परंतु फक्त काशिनाथ पेडणेकर यांच्या घरातील कपाटातून ७ हजार रुपये चोरांच्या हाती लागल्याचे समजते. यापूर्वी म्हणजेच, ९ आॅक्टोबर रोजी दुपारी १२च्या दरम्यान शिस्ते येथील दिलीप भायदे हे काही खरेदीसाठी बाजारामध्ये आले असता व दरवाजा अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरांनी घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाRaigadरायगड