दुचाकींच्या धडकेत एक ठार

By Admin | Updated: October 16, 2015 02:22 IST2015-10-16T02:22:01+5:302015-10-16T02:22:01+5:30

तालुक्यातील नेरळ-कशेळे-भीमाशंकर रोडवर वाकस पूल येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून

One killed in a bicycle shock | दुचाकींच्या धडकेत एक ठार

दुचाकींच्या धडकेत एक ठार

कर्जत : तालुक्यातील नेरळ-कशेळे-भीमाशंकर रोडवर वाकस पूल येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून, त्याला बदलापूर येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नेरळजवळ असलेल्या कोल्हारे गावचा मूळ रहिवासी असलेला भूषण यशवंत कोळंबे (२८) हा आपली एमएच-४६, एए-४४०३ ही बजाज डिस्कव्हर दुचाकी घेऊन आन्थ्रट येथील घरी नेरळ -कशेळे-भीमाशंकर रस्त्याने जात होता. त्यावेळी वाकस येथील रामदास दळवी (३०) हा आपली एमएच-४६- एके-७२३७ ही होंडा शाइन दुचाकी घेऊन भरधाव वेगाने नेरळकडे भीमाशंकर-कशेळे रस्त्याने येत होता. त्यावेळी भूषण आणि रामदास यांच्या दुचाकीची सकाळी १० च्या सुमारास वाकस पुलाच्या अलीकडे कुंभे गावाच्या वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातात रामदास दळवी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर भूषण कोळंबे गंभीर जखमी झाले. (वार्ताहर)

Web Title: One killed in a bicycle shock