शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
2
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
3
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
4
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
5
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
6
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
7
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
8
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
9
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
10
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
11
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
12
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
13
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
14
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
15
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
16
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
17
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
18
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
19
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
20
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
Daily Top 2Weekly Top 5

रोहा येथे ग्रामसेवकांचे एक दिवसीय धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 22:54 IST

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन

धाटाव : राज्यातील २२ हजार ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनाला ९ आॅगस्ट क्रांतिदिनी सुरुवात झाली आहे. रोहा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाºयांनी पंचायत समिती कार्यालसमोर एकत्र येत धरणे आंदोलन केले. या वेळी रोहा गटविकास अधिकाºयांना आपल्या प्रलंबित मागण्या व असहकार आंदोलनाचे पुढील स्वरूप दर्शविणारे निवेदन दिले. ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या या असहकार आंदोलनाला पंचायत समिती कर्मचारी संघटनेनेही आपला पाठिंबा दर्शविला आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाºयांनी ९ आॅगस्टपासून आपल्या असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात रोहा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते. या वेळी गटविकास अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात आपल्या पुढील मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करावी. ग्रामसेवक संवर्गास शासन नियमाप्रमाणे प्रवासभत्ता मंजूर करावा. ग्रामसेवकाची शैक्षणिक अर्हता बदल करून पदवीधर उमेदवारांची निवड करावी. २०११ च्या लोकसंख्येनुसार राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्माण करावीत. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात. २००५ नंतर सेवेत लागलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कर्त्यांना आगाऊ वेतनवाढ देत, ‘एक गाव एक ग्रामसेवक’ याची निर्मिती करावी. ग्रामसेवकांची अतिरिक्त कामे कमी करावीत या मागण्यांचे निवेदन दिले. यासोबतच ९ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट आंदोलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा या निवेदनात दिली आहे. या दरम्यान फक्त जनतेची कामे करणार असे सांगत अन्य सर्व प्रशासकीय कामांवर बहिष्कार असणार, असे नमूद केले आहे. २२ आॅगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास त्यानंतर कामकाज बंद राहणार असा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.