शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कर्जतमध्ये जुन्या कारला आग; बालकाचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 01:14 IST

तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जुन्या कारने अचानक पेट घेतल्याने, त्यात खेळणारा चार वर्षीय बालक होरपळल्याचा प्रकार कर्जत-उमरोली येथे घडला. ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

नेरळ : तीन महिन्यांपासून बंद असलेल्या जुन्या कारने अचानक पेट घेतल्याने, त्यात खेळणारा चार वर्षीय बालक होरपळल्याचा प्रकार कर्जत-उमरोली येथे घडला. ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.उमरोली येथे एमएच ०२ एनए ५६२५ ही बंद गाडी तीन महिन्यांपासून रस्त्यावर उभी होती. गाडीच्या काचा उघड्या असल्याने परिसरातील लहान मुले त्यात खेळायची. २२ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास या गाडीला आग लागली. शेजारी असणाऱ्या महिलांनी आरडाओरड केली असता स्थानिक नागरिकांनी आग विझविली. या आगीत अभय उमेश बुंधाटे होरपळला.ग्रामस्थांनी त्याला तातडीने डिकसळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परिस्थिती गंभीर असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास नवी मुंबईत असलेल्या ऐरोली भागातील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. शुक्रवारी रात्री त्याला ऐरोली येथे नेले. मात्र, दुसºया दिवशी २३ मार्च रोजी सकाळी अभयचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत ऐरोली पोलीस ठाण्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जत पोलीस कारवाई करणार आहेत. अर्धवट जळालेली कार अजूनही तेथेच पडून आहे.

टॅग्स :Karjatकर्जत