शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील रेवतळे-नागेश्वर नदीवरील जुना पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:56 IST

महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर शेट यांनी प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिले आहे. ग्रामपंचायत रेवतळे सरपंच किशोर शेट यांनी दिलेल्या पत्रानुसार महाड ते रेवतळे मार्गे मंडणगड खेड व दापोली हा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. या मार्गावर रेवतळे येथील नागेश्वरी नदीवर असणारा पूल कालबाह्य व नादुरुस्त झाला आहे. या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा चालू आहे.पुलाची उंची कमी असल्याने तो पावसाळ्याच्या दिवसात वारंवार पाण्याखाली असतो, त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना तासन्तास थांबावे लागत असल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होतो, त्यामुळे पुढील गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा संपर्क तुटतो. पूल कालबाह्य व नादुरुस्त असल्याने केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते, अशी भीती लेखी निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.हा पूल आंबिवली येथील धरणक्षेत्राच्या पाण्याखाली जात असल्याने या पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल बांधण्यात येत आहे; परंतु या नवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत, माहिती व योग्य कारवाईकरिता तहसीलदार महाड उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड स्थानिक आमदार भरत गोगावले यांना देण्यात आली आहे.>नवीन पुलाचे काम रखडलेनवीन पुलाचे बांधकाम रखडल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. रेवतळे येथील नागेश्वरी नदीवरील जुन्या पुलावरील वाहतूक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्याकरिता तातडीने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.