शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामात अडथळा; दीड वर्ष झाले तरी दासगाव खिंडीचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 23:26 IST

वनविभागाची परवानगीत दिरंगाई

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आजही जोरात सुरू आहे. २०२१ मध्ये हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अनेक ठिकाणी या महामार्गाच्या कामात वनखात्याच्या अडचणी असल्याने त्या ठिकाणी ठेकेदार कंपनीला काम करता येत नाही. दीड वर्ष झाले तरी दासगाव खिंडीच्या कामात वनखात्याकडून परवानगीच मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इंदापूर ते कोकणाच्या तळापर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. नेहमी या मार्गावर येणारे अडथळे, महामार्गावर पडणारे खड्डे आणि दुपदरी रस्ता यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सध्या हे काम तेजीत असून, ५० टक्के मार्गी लागले आहे. या मार्गावरच कशेडी बोगद्याचे काम सुरू आहे; परंतु आजही काही ठिकाणी या कामाच्या चौपदरीकरणात वनखात्याच्या जमिनी येत असल्याने त्या-त्या ठिकाणी वनखात्याकडून काम करण्यास परवानगी मिळालेली नाही.

दुसऱ्या टप्प्यामधील वीर ते पोलादपूर या चौपदरीकरणाचे काम एल अ‍ॅण्ड टी या कंपनीकडे आहे. याच टप्प्यातील दासगावच्या हद्दीतील खिंडीच्या ठिकाणी अद्याप महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यास वनखात्याकडून परवानगी मिळालेली नाही. या खिंडीमध्ये राखीव वन आणि संरक्षित वन अशी वनखात्याची जमीन आहे. गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी काम करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महामार्ग वनविभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आले. त्याप्रमाणे रोहा वनखात्याकडून हा प्रस्ताव नागपूर वरिष्ठ कार्यालयात पाठवला. या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी काढत, पुन्हा खाली पाठवण्यात आला. पुन्हा महामार्ग विभागाकडून त्रुटी दूर करत हा प्रस्ताव पुन्हा पाठवाला. सध्या परिस्थितीत खालून वर आणि वरून खाली, असा परवानगीचा प्रस्ताव झुलत आहे. दासगाव खिंडीच्या ठिकाणी परवानगी नसल्याने ठेकेदार कंपनीला काम करता येत नाही.

दीड वर्षापूर्वी दासगाव खिंडीच्या ठिकाणचे काम करण्याचे प्रस्ताव वनखात्याकडे सादर करण्यात आले होते. नागपूर कार्यालयाकडून काही त्रुटी काढत हे प्रस्ताव पुन्हा खाली पाठवण्यात आले. त्रुटी काढून परवानगीसाठी हा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात आला आहे.- बी.जे.एम.नायडू, प्रकल्प व्यवस्थापक

राखीव आणि संरक्षित वनामुळे हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. परवानगी प्राप्त न झाल्याने काम सुरू करण्यात आलेले नाही.- प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल, महाड

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अशा प्रकारे परवानगी मिळण्यास आणखी विलंब झाला, तर २०२१ मध्ये महामार्गाच्या कामाचे स्वप्न अपुरेच राहणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र