शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

जिल्ह्यात एड्सग्रस्तांचे प्रमाण घटले

By admin | Updated: February 12, 2017 03:16 IST

राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या नियोजनानुसार, रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण यंत्रणा आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून जनजागृती,

- जयंत धुळप,  अलिबागराज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या नियोजनानुसार, रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण यंत्रणा आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून जनजागृती, सातत्यपूर्ण तपासणी कार्यक्रम, सत्वर उपचार संदर्भ सेवा यामुळे रायगड जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले आहे. २०००मध्ये हे प्रमाण ४२ टक्के होते, ते २०१६अखेरीस १.५ टक्क्यांवर आणण्यात यश आल्याची माहिती रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण यंत्रणेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रणाच्या (डापकू) माध्यमातून, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ७१ हजार ९० संशयित रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यामध्ये ०.५७ टक्के म्हणजे ४०४ रुग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळले. तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ७ हजार ९१६ एचआयव्ही बाधित रुग्ण असून त्यापैकी ५ हजार ४४४ उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले आहेत. गतवर्षभरात ०.०५ टक्के म्हणजे २४ एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले. त्यापैकी २३ गरोदर माता असून, त्यांना पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले आहे. प्रत्येक गरोदर मातेची एचआयव्ही तपासणी व समुपदेशन करण्यात येत असून, एचआयव्ही तपासणी वाचून कोणतीही गरोदर माता वंचित राहणार नाही, याची खबरदारी ‘डापकू’च्या माध्यमातून घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीमार्फत देण्यात आलेली जनरल क्लायंट व एनएनसीची १०० टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत खासगी रुग्णालयामध्ये एचआयव्ही तपासणी व्हावी, याकरिता साथी, मुंबई या संस्थेच्या सहकार्याने तीन प्रकारचा करार करून एचआयव्ही तपासणीची सुविधा ३३ ठिकाणी उपलब्ध आहे. रायगडमधील अलिबाग, माणगांव व रोहा येथे संशयित रुग्ण निरीक्षण नोंदीकरिता ‘सेंटीनल सर्व्हेलन्स सर्विस’ यंत्रणा ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.सरकारी आरोग्यसेवेतील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश दिवेकर, महिला व बालविकास अधिकारी बी.एस. वाघमारे, जिल्हा रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक गोसावी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग शिंदे, डॉ. ए.आर. कोकरे, डॉ. जगदिश दिवेकर, साथी स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या जागृती गुंजाळ, आधार ट्रस्ट स्वयंसेवी संस्थेच्या मनीषा अहिवले, एस.एस.कुरणे यांनी एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी करण्याच्या अनुषंगाने बैठकीत प्रस्तुतीकरण केले. ६३ हजार ७३१ क्षयरुग्ण संशयितांची तपासणीगतवर्षभरात ६३ हजार ७३१ संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ हजार ८५५ संशयित रुग्णांना उपचारार्थ संदर्भित करण्यात आले. यामध्ये ३९४ रुग्णांना क्षयरोग आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर क्षयरोग उपचार घेतलेल्या ३ हजार २६५ पैकी २ हजार ८८९ रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये ५ रुग्णांना एचआयव्ही व क्षय (टीबी) संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.