शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

बायोमेट्रिक पद्धत न वापरल्याने ७० रेशनिंग दुकानदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:11 IST

शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत रेशनिंग धान्याचा पुरवठा होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड रेशनिंग दुकानांना संलग्न केले आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत रेशनिंग धान्याचा पुरवठा होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड रेशनिंग दुकानांना संलग्न केले आहे. परंतु रेशन धान्य दुकानदार धान्य वाटप करताना बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याविरोधात जिल्ह्यातील ७० रेशनिंग दुकानदारांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अलिबाग, पनवेल, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्यात ही कारवाई करण्यात आली असली तरी, अन्य तालुक्यांमध्येही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.केशरी, पिवळे आणि बीपीएलमधील लाभार्थ्यांना किमान स्वस्त दरात रेशन उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने सरकारी रेशन दुकानावर रेशन देण्याची सोय केलेली आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या नावावरचे रेशन हे काही रेशनिंग दुकानदार परस्पर विकत असल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यामुळे सरकारने रेशनिंगच्या दुकानामध्ये आधार सक्ती केली. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याच्या हाताच्या बोटाचे ठसे, नाव, पत्ता याची माहिती सरकारकडे आधार लिंक केल्याने आहे. लाभार्थ्याने रेशनिंग दुकानातून रेशन घेताना त्याला आधीच बायोमॅट्रिक नोंद करणे अनिवार्य आहे. त्यामुळे कोणत्या लाभार्थ्याने कोणते आणि किती रेशन कोणत्या तारखेला नेले याची नोंद सरकारच्या पोर्टलवर होते. त्यामुळे रेशन चोरी करणे अथवा परस्पर विकणे याला चांगलाच आळा बसला आहे. परंतु यातूनही काही रेशनिंग दुकानदार गडबड करीत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने याची माहिती घेण्यास सुरुवात केली. बायोमेट्रिक पध्दतीने कामकाज न करणारे ७० रेशनिंग दुकानदार अलिबाग, पेण, पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात आढळून आले. त्यामुळे त्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.दुफारे यांनी दिली. पहिल्या टप्प्यामध्ये ७0 रेशनिंग दुकानदार आढळले आहेत. कारवाईबाबतची प्रक्रिया सर्वत्रच केली जात आहे. त्यामध्ये नियम धाब्यावर बसवणारे सापडण्याची शक्यताही व्यक्त केली.रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार ३५९ रेशनिंगची दुकाने आहेत. त्यामध्ये अलिबाग-८२,पेण-११२, मुरुड-३२, पनवेल-१९३, उरण-६७, खालापूर- १३२, कर्जत-१४२, माणगाव-१0६,रोहे-९७, तळा-३४, सुधागड-७५, महाड-१३0, पोलादपूर-७१, म्हसळा-४२, श्रीवर्धन-४४ आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल तीन लाख ४३ हजार रेशनिंग लाभार्थ्यांची संख्या आहे. प्राधान्य गटातील ९४ टक्के आणि अंत्योदय गटातली ८४ टक्के लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक करून झाले आहे. प्राधान्य गटातील सहा टक्के आणि अंत्योदय गटातील १६ टक्के लाभार्र्थ्यांचे आधारकार्ड लिंक झालेले नाही.बायोमेट्रिक पध्दतीने लाभार्थ्याला धान्य देताना त्याच्या हाताच्या बोटाचे ठसे जुळून येत नसतीलही तसेच नेटवर्कचीही अडचण असेल, परंतु काही ठिकाणी काही दुकानदार याच कारणांचा आधार घेऊन लाभार्थ्यांना वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरकारने आणि प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. रेशनिंग दुकानदार सातत्याने हीच कारणे पुढे करत असेल तर व्यवहारावर खरेच लक्ष ठेवण्याची गरज आहे.>रेशनिंग दुकानदारांच्या समस्यालाभार्थी रेशनिंग घेण्यासाठी येतो तेव्हा बायोमेट्रिक पद्धतीने त्याला धान्य देताना त्याच्या हाताच्या बोटाचे ठसे जुळून येत नाही, तर कधीकधी नेटवर्क नसल्यामुळेही अडचणी येतात. त्यामुळे बायोमेट्रिकची अंमलबजावणी करता येत नाही, असे रेशनिंग दुकानदारांचे म्हणणे आहे.