शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नोटाबंदीचा निषेध...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:40 IST

नोटाबंदीला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने काळा दिवस पाळण्यात आला.

अलिबाग : नोटाबंदीला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने काळा दिवस पाळण्यात आला. नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करून तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. नोटाबंदी, जीएसटी यासारखे मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे फेल ठरले आहेत. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी आंदोलन केले.केंद्रात व राज्यात भाजपा व शिवसेना सत्तेत येऊन ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत या सरकारने राबवलेल्या योजनेचे फक्त नाव बदलून नवीन योजना सुरू केल्याचे जनतेला दाखवले आहे. नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय हे सपशेल चुकीचे असल्याचे सद्यपरिस्थितीत आपणास जाणवत आहे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी योग्य ती भूमिका घेऊन आंदोलन, मोर्चे केले, परंतु या सरकारने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. येत्या काळात सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने भाजपा व शिवसेना सरकारचा निषेध करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना मोठी जाहिरात करून सुरू करण्यात आली. जाहिरातीप्रमाणे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र ती योजना फसवी असल्याचे दिसून आले आहे. त्याप्रमाणे सरसकट १०० टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, धान्य, भात, सोयाबीन, तूर आदी कृषी मालाची खरेदी सरकारने किमान आधारभूत किंमत देऊन करावी.कापसासारख्या पिकाला राज्य सरकारने किमान आधारभूत किंमत देण्याबरोबरच किमान ५०० रुपये बोनस द्यावा त्याचबरोबर परतीच्या पावसामुळे कापूस, भात, सोयाबीन यासह अन्य पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. अपुºया वीज पुरवठ्याचा त्रास शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी यांना होत आहे. तरी वीज पुरवठा नियमित करावा, राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याबाबतच्या घोषणा हवेतच विरल्या असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी दत्ता ढवळे, संतोष निगडे, जगदीश घरत, ऋ षिकांत भगत, मीनाक्षी खरसंबळे, आशिष भट, विजय कडवे, हेमनाथ खरसंबळे, समीर रोणे, राजन तांडेल, प्रकाश थळे आदी उपस्थित होते.हाताला काळ्या फिती लावून म्हसळ्यात मोर्चाम्हसळा : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाच्या विरोधातील सर्वपक्षीय कंबर कसून तयार झाले आहेत. त्याअनुषंगाने म्हसळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस(आय)कडून मोदी सरकारविरोधात म्हसळा काँग्रेस कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत हाताला काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देऊन मोदी सरकार विरोधातील आपला निषेध व्यक्त केला. म्हसळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसकडून नोटाबंदीचा ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जात आहे अशा स्वरूपाचे निवेदन म्हसळा तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांना देण्यात आले.या प्रसंगी म्हसळा तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव पाटील, तालुका काँग्रेस नेते डॉ. मोईज शेख, तालुका काँग्रेस युवा अध्यक्ष अकमल कादिरी, तालुका महिला अध्यक्ष रझिया अ. रशीद परदेसी आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादीचा मूक मोर्चा;काळी फीत लावून निषेधआगरदांडा : मुरु ड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नोटाबंदीचा विश्वासघातकी सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुरु ड नगरपरिषद येथून ते संपूर्ण मुरु ड शहरात काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला. मुरु ड नगरपरिषद येथून सकाळी मूक मोर्चाला सुरु वात करण्यात आली. आझाद चौकात मूक मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. त्या सभेत तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजच मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजार रु पयांच्या नोटा कायद्याने अमान्य होतील या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेने जग हादरले. याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. बँकेत नोटा बदलीसाठी रोज रांगेत उभे राहावे लागत होते, याचा त्रास सहन करावा लागला. याच रांगेत उभ्या राहणाºया अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. नोटाबंदी हा महाविनाश करणारा आर्थिक निर्णय होता, हे सिद्ध झाले आहे.नोटाबंदीमुळे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला नाही तर समाजव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त फटका गरीब, लहान व्यापारी आणि सामान्य जनतेला बसला, अनेकांचे रोजगार गेले. सरकारने नोटाबंदी करून सामूहिक लूट केली, त्यामुळे आर्थिक विकासाला धोका निर्माण झाला. या सरकारने नोटाबंदीचा विश्वासघातकी निर्णय घेऊन,सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यातून उठविणाºया निर्णयाने वर्षभरानंतर देश भ्रष्टाचारमुक्त तर झाला नाही, उलट भ्रष्टाचार आणखी वाढत आहे. या सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे काळा दिवस असून या निर्णयाचा मुरु ड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करीत आहोत. शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले, त्यांना यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मुरु ड तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, शहर अध्यक्ष विजय भोय आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसच्यावतीने पनवेलमध्ये नोटाबंदीविरोधात काळा दिवसपनवेल : रायगड जिल्हा काँग्रेस तसेच पनवेल तालुका व शहर काँग्रेस व युवक, महिला, सेवादल, अल्पसंख्याक विभाग व सर्व सेलच्या वतीने बुधवारी पनवेल काँग्रेस भवन ते अश्वारूढ शिवाजी पुतळ्यापर्यंत नोटाबंदीविरु द्ध मोर्चा काढून काळा दिवस पाळण्यात आला. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीसारख्या तुघलकी फरमानचा जाहीर निषेध केला. या वेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. के. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस निर्मला म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून सरकारचा निषेध केला. राष्ट्रीय इंटकचे सचिव महेंद्र घरत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करून नोटाबंदी हा निर्णय चुकीचा आहे असे सांगितले, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्याम म्हात्रे यांनी सरकारचा निषेध केला. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत यांनी या सरकारच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले असून या नोटाबंदीमुळे गोरगरीब जनतेने जीव गमावला असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास सांगितले. सरकारच्या या निर्णयाने अनेक व्यापारी, छोटे व्यावसायिक, नोकरदार यांना नाहक त्रास झाला. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे तसेच लोकांचे आभार पनवेल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी मानले. यावेळी पनवेल पंचायत समिती उपसभापती वसंत काठावले, सदस्य श्रावण भल्ला, कृ. उ. बा. स. संचालक प्रकाश पाटील, माजी नगरसेविका शशिकला सिंग, तालुका चिटणीस महादेव कटेकर, ज्येष्ठ नेते सईद मुल्ला व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Note Banनोटाबंदी