शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पाणी योजना नावाला, पाणी नाही नळाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:28 IST

पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातून बारमाही वाहणारी उल्हास नदी तालुक्यासाठी वरदान आहे. या नदीवर अनेक पाणीयोजना कार्यन्वित असून, अनेक गावांची तहान ही नदी भागवते. अशीच पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वंजारपाड्यातील ग्रामस्थांची तारांबळ उडत असून, महिलांना रात्र विहिरीवर जागून काढावी लागत आहे. दरम्यान, पाणीयोजनेच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे थेट जिल्ह्यधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.कर्जत तालुक्यातील दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा, शेंडेवाडी या गावांसाठी २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी योजना तयार करण्यात आली होती. एका वर्षाच्या आत योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली.उल्हास नदीवरून साधारण दीड कि.मी. अंतरावरून पाणी गावात आणले गेले. गावात घरोघरी नळही बसवले गेले, नळाला पाणी आले. मात्र, आता ही पाणी योजना नावापुरती उरली आहे. पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठा समितीने ग्रामपंचायतीकडे ही योजना हस्तांतर केलीच नाही आणि नळाला आलेल्या पाण्याचे कोणाला बिलही आले नाही. परिणामी, योजना आता नावापुरती उरली आहे. ४९ लाख रुपये एवढा निधी खर्च करून बनवलेल्या या पाणी योजनेची जलवाहिनी प्लास्टिकची आहे, त्यामुळे ती सतत कुठेतरी फुटते. विजेचे बिल थकीत आहे, तर मोटार चोरीला जाण्याच्या आणि त्या व्यवस्थित न हाताळल्यामुळे जळण्याच्या घटना अनेकदा घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी, पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.गावातील एकमेव विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे. मात्र, विहिरीलाही पाणी मर्यादित असल्याने पाण्यासाठी महिलांना रात्री विहिरीवर मुक्काम करावा लागत आहे. अनेकदा बैठकी घेऊन पाणीपुरवठा समितीकडे याबाबत विचारणाही करण्यात आली आहे. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावातील या पाणीबाणीमुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, योजनेच्या चौकशीसाठी थेट जिल्हाधिकारी रायगड यांना तक्रारी अर्ज सादर केला आहे.पाणी योजना सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वीजपुरवठा कमी-जास्त प्रमाणात होत असल्याने मोटार जळाली होती, ती दुरुस्त करून लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा सुरू होईल.- बाबूराव माळी,सचिव, पाणीपुरवठा समितीवयामुळे डोक्यावरून हंडे भरून आणणे आता शक्य होत नाही आणि आणलेले पाणी पुरतही नाही. पाणी विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आम्ही करायचे काय? पाण्याविना मरण पत्करावे का?- मनुताई धुळे,वयोवृद्ध महिला ग्रामस्थबायकांना घरातली कामे आणि पाणी दोघांचा मेळ बसवावा लागतो; पण तो न बसल्याने आमची तारांबळ उडते. एवढी पाणी योजना गावात येऊन तिचा आम्हाला काय फायदा झाला?- मंदाबाई आगे,महिला ग्रामस्थ

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी