शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही तर दुपारचे जेवणही नाही; ८ दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही

By राजेश भोस्तेकर | Updated: April 9, 2024 08:03 IST

आठवडा झाला, रायगडमधील नेहुली जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही

राजेश भोस्तेकरलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगडमधील पाणीटंचाईची झळ आता शाळांपर्यंत पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नेहुली शाळेत पाणी नसल्याचे कारण देत शाळेत माध्यान्ह भोजन शिजले नाही. त्यामुळे आठवड्यापासून विद्यार्थ्यांना घरून डबा घेऊन जावे लागत आहे. निवडणुकीची धामधूम सुरु असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही. 

खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत नेहुली गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या गावात अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे. एमआयडीसीमार्फत गावात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सध्या पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे. तर खासगी वाहिनीवरून सध्या ग्रामस्थ पाणी घेत आहेत. शाळेतही पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या शाळेत पाणी येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

आठवडाभर विद्यार्थी आणताहेत घरून डबागेल्या आठवड्यापासून शाळेत पाणी नसल्याने अन्न शिजविण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन बंद झाले आहे. विद्यार्थी सध्या शाळेत येताना घरून डबा घेऊन येत आहेत.

प्रशासन अनिभज्ञसंबंधित समस्येबाबत शाळा व्यवस्थापनाने शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना संपर्क केला असता माहिती घेते, असे म्हणाल्या. तर अलिबागच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही.

शिक्षिकेचे म्हणणे काय? जिल्हा परिषदेच्या नेहुली शाळेतील शिक्षका मेधा पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा