शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी मुहूर्त मिळेना, दहा वर्षांपासून काम रखडलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:32 IST

Raigad News : तब्बल दहा वर्षांच्या कालावधी उलटून गेला तरीही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही.

पेण : तब्बल दहा वर्षांच्या कालावधी उलटून गेला तरीही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नाही. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन ज्या जागेवर होणार आहे. त्या वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द या गावठाणातील जागांची पाहणी, घरांची झालेली मोजणी, मूल्यांकन नोंदी व बाळगंगा मध्यम धरण प्रकल्पाच्या साइटवर आजपर्यंत झालेल्या कामाचा पाहणी दौरा गतवर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष घेऊन बाधितांच्या पुर्नवसनाची कामे लवकरच करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र २०२० वर्षात कोरोना, नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता नवीन वर्षात बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू होतील का? याकडे प्रकल्पबाधितांचे लक्ष लागले आहे.पेणमधील वरसई, जावळी निफाड खोऱ्यातील बाळगंगा नदीतटावरील ९ महसुली गावे १३ वाड्यावरील ३३४० कुटुंब बाळगंगा मध्यम प्रकल्पाबाधित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनवर्सन व्हावे यासाठी अनेकदा याबाबतीत पाहणी दौरे केले गेले. त्यानंतर आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. भाजपचे सरकार सत्तेवर आले, आता महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. बाळगंगा प्रकल्पाच्या दहा वर्षांच्या कालावधीत बाळगंगा तटावरील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जमिनीला योग्य मोबदला व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलने झाली होती. शेवटच्या आंदोलनात मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस आंदोलकांवर केसेस दाखल झाल्या. मात्र, बाळगंगा प्रकल्पगस्तांची जिद्द काही कमी झाली नाही. रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गतवर्षी सिडकोचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पुनर्वसन अधिकारी कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन बाळगंगा धरण प्रकल्पाच्या कामाची साइटवर पाहणी केली होती. त्याचबरोबरीने वाशिवली, वरसई व गागोदे खुर्द गावातील गावठाणातील जागांची पाहणी करून या ठिकाणी प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन व नागरी सोयीसुविधा याबाबत पाहाणी दौऱ्या प्रसंगी चर्चा झाली होती. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुनर्वसन कामे लवकरच करण्याचे आदेश दिल्यानंतर २०२० वर्षात प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनाला गती मिळाली नाही. 

टॅग्स :DamधरणRaigadरायगड