शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

कौतुकास्पद ! लोकसहभागातून उभारली नऊ तलाठी कार्यालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 02:13 IST

शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार : पनवेल, उरणमध्ये लवकरच लोकार्पण

वैभव गायकर

पनवेल : लोकसहभागातून पनवेल उरण तालुक्यातील नऊ हायटेक तलाठी कार्यालये उभारण्यात आली आहेत. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या संकल्पनेतून दोन्ही तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे तलाठी कार्यालयाशी संबंधित शेतकऱ्यांची कामे त्यांच्या गावातच होणार असून, पनवेल अथवा उरण शहरात कामानिमित्त खेटे मारण्यापासून शेतकºयांची मुक्तता होणार आहे.

नऊ तलाठी कार्यालयांमध्ये पनवेल तालुक्यातील पोयंजे, असूडगाव, पालेखुर्द, मोहो, वावंजे, पनवेल १ व २ अशा सात तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. उरण तालुक्यात बोरले व विंधणे या दोन तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. संबंधित तलाठी कार्यालये पूर्णपणे लोकसहभागातून उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी, समाजसेवक, बांधकाम व्यावसायिक आदींनी हातभार लावला आहे. तलाठी कार्यालयात सातबारा, फेरफार नोंदी, शेतसारा कर, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे, ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रभाग रचना आदींसह तहसीलदारांच्या आदेशानुसार शासकीय कामे तलाठी कार्यालयातून चालतात.शेतीशी संबंधित लहान सहान कामांसाठीदेखील शेतकºयांना तलाठी कार्यालय गाठावे लागते. गावात कार्यालये नसल्याने त्यांना थेट पनवेल अथवा उरण शहर गाठावे लागत आहे. काही वेळेला तलाठी कार्यालयात नसल्याने शेतकºयांना रिकाम्या हाती परतावे लागते. याकरिता सध्या त्या ठिकाणी तलाठी कार्यालय उभारण्याचा मानस प्रांत अधिकारी नवले यांनी आखला. याची सुरुवात करण्यात आली असून, भविष्यात पनवेल तालुक्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी तलाठी कार्यालय उभारले जाणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.तालुक्यात मोठ्या संख्येने सरकारी जागेवर अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, तलाठी कार्यालय उभारण्यासाठी अशाच सरकारी जागेची निवड करण्यात आली आहे, जेणेकरून सरकारी जागेवरील अतिक्रमणांवरदेखील आपोआपच आळा बसणार आहे.आॅनलाईन सातबारा मिळणार१ तलाठी कार्यालयांचे जवळ जवळ ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्याच्या घडीला या कार्यालयात फर्नीचरचे काम सुरु आहे. २३ डिसेंबर रोजी प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले यांनी पोयंजे व बोरले गावातील तलाठी कार्यालयांची पाहणी केली.२डिसेंबर महिन्याअखेर या सर्व कार्यालयांची कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यालयात इंटरनेटची व्यवस्था असल्याने शेतकºयांना आॅनलाईन सातबारा आदींसह विविध शासकीय कागदपत्रे या कार्यालयातून काढता येणार आहेत.शेतकºयांना मिळाला दिलासाच्पनवेल तालुक्यातील पोयंजे, असूडगाव, पालेखुर्द, मोहो, वावंजे, पनवेल १ व २ अशा सात तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. तर उरण तालुक्यात बोरले व विंधणे या दोन तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.संपूर्ण लोकसहभागातून साहित्य स्वरूपाची मदत घेऊन हि तलाठी कार्यालये उभारण्यात आली आहेत. शेतकºयांना गावातल्या गावातच अधिकारी उपलब्ध व्हावेत यादृष्टीने आमचे प्रयत्न होते. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी शेतकºयांना फेºया माराव्या लागणार नाहीत. संबंधित कार्यालये उभारण्यासाठी मदत करणाºया प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत- दत्तात्रय नवले, प्रांत अधिकारी , पनवेल 

टॅग्स :Raigadरायगड