शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्ह्यातील नऊ धरणे ओव्हरफ्लो,पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:01 IST

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार ४ ते ६ जुलै अशा येत्या तीन दिवसांकरिता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारीही कायम होती.

- जयंत धुळपअलिबाग : कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार ४ ते ६ जुलै अशा येत्या तीन दिवसांकरिता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारीही कायम होती. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली. या पार्श्वभूमीवर किनारी भागांतील गावांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर १२ ते १७ जुलै दरम्यान समुद्रास ४.५० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटबंधारे विभागाच्या एकूण २८ धरणांपैकी नऊ धरणे भरून वाहू लागली आहेत. या नऊ धरणांमध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड (१०० टक्के), रोहा तालुक्यातील सुतारवाडी (१०० टक्के), सुधागड तालुक्यातील कवेळे (१०६ टक्के), उन्हेरे (११० टक्के), म्हसळा तालुक्यातील पाभरे (१०० टक्के), संदेरी (१०० टक्के), महाड तालुक्यातील खिंडवाडी (१०१ टक्के), खैरे (१०७ टक्के) आणि खालापूर तालुक्यातील भिलवले(१०० टक्के) या धरणांचा समावेश आहे.उर्वरित धरणांमध्ये तळा तालुक्यातील वावा (७२ टक्के), पेण तालुक्यातील आंबेघर (१९ टक्के), अलिबाग तालुक्यातील श्रीगाव (१० टक्के), सुधागड तालुक्यातील कोंडगाव (८२ टक्के), घोटवडे (५६ टक्के), ढोकशेत (४८ टक्के), श्रीवर्धन तालुक्यात कार्ले (४३ टक्के), कुडकी (७८ टक्के), रानिवली (२१ टक्के), महाड तालुक्यात वरंध (९२ टक्के), कोथुर्डे (९७ टक्के), कर्जत तालुक्यात साळोख (२० टक्के), अवसरे (४७ टक्के), खालापूर तालुक्यातील कलोते-मोकाशी (७३ टक्के), डोणवत (५० टक्के), पनवेल तालुक्यातील मोर्बे (८६ टक्के), बामणोली (४२ टक्के), उसरण (७९ टक्के), उरण तालुक्यातील पुनाडे (४१ टक्के) या धरणांच्या जलपातळीतही वाढ होत आहे.संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाने मंगळवारच्या नोंदीनुसार, रोहा तालुक्यातील पूरधोका पातळी २३.९५ मीटर असणाऱ्या कुंडलिका नदीची डोळवहाळ येथे प्रत्यक्ष जलपातळी २२.२० मीटर, रोहा तालुक्यातील पूरधोका पातळी नऊ मीटर असणाºया अंबा नदीची नागोठणे येथे प्रत्यक्ष जलपातळी ४.१५ मीटर, महाड तालुक्यातील पूरधोका पातळी ६.५० मीटर असणाºया सावित्री नदीची महाड येथे प्रत्यक्ष जलपातळी ३.३० मीटर, खालापूरमध्ये पूरधोका पातळी २१.५२ मीटर असणाºया पाताळगंगा नदीची लोहप येथे प्रत्यक्ष जलपातळी १८.३० मीटर, कर्जतमध्ये पूरधोका पातळी ४८.७७ मीटर असणाºया उल्हास नदीची कर्जत येथे प्रत्यक्ष जलपातळी ४३.८० मीटर, तर पनवेलमध्ये पूरधोका पातळी ६.५५ मीटर असणाºया गाढी नदीची पनवेल येथे प्रत्यक्ष जलपातळी २.७० मीटर निष्पन्न झाली आहे.१२ ते १७ जुलै दरम्यान संभाव्य लाटांचा तपशीलअ.क्र. वार दिनांक वेळ संभाव्य उंची१. गुरु वार १२ जुलै २०१८ सकाळी ११.२७ वा. ४.६५ मीटर२. शुक्र वार १३ जुलै २०१८ दुपारी १२.१३ वा. ४.८५ मीटर३. शनिवार १४ जुलै २०१८ दुपारी ०१.०२वा. ४.९६ मीटर४. रविवार १५ जुलै २०१८ दुपारी ०१.४९ वा. ४.९७ मीटर५. सोमवार १६ जुलै २०१८ दुपारी ०२.३७ वा. ४.८९ मीटर६. मंगळवार १७ जुलै २०१८ दुपारी ०३.२५ वा. ४.७० मीटर

टॅग्स :Damधरण