शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचे चार उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:38 IST

रायगड लोकसभा मतदारसंघातील एका जागेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दोन उमेदवारांनी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल के लेआहेत.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील एका जागेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दोन उमेदवारांनी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल के लेआहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांचे चार तर अदिती सुनील तटकरे यांच्या एका अर्जाचा समावेश असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.अलिबागच्या जेएसएम कॉलेजमधून पुणे विद्यापीठाची पी.डी. सायन्स पदवी संपादन केलेल्या तटकरे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच कोणत्याही न्यायालयात कोणत्याही स्वरूपाचा खटला दाखल नसल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज सादर करताना तटकरे यांनी दिलेल्या शपथपत्रात आपली एकूण बँक खात्यातील जमा, रोख रक्कम व दागदागिने ही संपत्ती ३ कोटी ९१ लाख ०७ हजार ५७३ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात दाखल केलेल्या बँक खात्यातील जमा, रोख रक्कम व दागदागिने संपत्तीमध्ये १ कोटी ३१ लाख ०६ हजार १९८ रुपयांनी वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली त्यांची ही संपत्ती २ कोटी ६० लाख ०१ हजार ३७५ रुपये होती. त्यांच्या पत्नी वरदा सुनील तटकरे यांच्या नावे सद्य:स्थितीत असणारी बँक बॅलन्स, रोकड व दागदागिने ही संपत्ती ६४ लाख ०४ हजार ७०४ रुपये नमूद करण्यात आली आहे. २०१४ च्या तुलनेत या संपत्तीत १० लाख २७ हजार २२४ रुपयांची घट दिसून येत आहे. २०१४ मध्ये ही संपत्ती ७३ लाख ३१ हजार ९२८ रुपये होती.प्रतिज्ञापत्रात नमूद तटकरे यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ३० लाख २३ हजार ९३० रुपये असून २०१४ च्या तुलनेत त्यात ४५ लाख २७ हजार ०९७ रुपयांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये ही संपत्ती ३ कोटी ८४ लाख ९६ हजार ८३३ रुपये होती.पत्नी वरदा तटकरे यांची स्थावर संपत्ती ३ कोटी ८९ लाख ५१ हजार ७० रुपये असून त्यामध्ये २०१४ च्या तुलनेत १ कोटी १ लाख ३८ हजार ७० रुपयांची वाढ झाली आहे. २०१४ मध्ये त्यांची ही संपत्ती २ कोटी ८८ लाख १३ हजार रुपये होती.

टॅग्स :RaigadरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक